शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सणवार अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 21:25 IST

नगर परिषदेत एका एजंसीच्या माध्यमातून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. परिणामी, कंत्राटी कर्मचारी अडचणीत असून त्यांचे सणवार अंधारात दिसून येत आहेत.मात्र यानंतरही नगर परिषदेकडून सदर एजंसीवर कुठली कारवाही करण्यात आली नसून उलट अभय दिले जात आहे.

ठळक मुद्देसंवेदनाहीन पालिका प्रशासन : सहा महिन्यापासून कंत्राटी कर्मचारी वेतनाविना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेत एका एजंसीच्या माध्यमातून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. परिणामी, कंत्राटी कर्मचारी अडचणीत असून त्यांचे सणवार अंधारात दिसून येत आहेत.मात्र यानंतरही नगर परिषदेकडून सदर एजंसीवर कुठली कारवाही करण्यात आली नसून उलट अभय दिले जात आहे.नगर परिषदेत एका एजंसीच्या माध्यमातून विविध विभागांत कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोजी रोटीसाठी हे कर्मचारी इमानदारीने काम करीत आहे. मात्र त्यांचे मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार देण्यात आले नाही. नगर परिषदेची आर्थिक स्थिती हलाखीची असताना एखाद्यावेळेस पगार मागे-पुढे होणे या कर्मचाऱ्यांनाही मान्य आहे. मात्र पाच-सहा महिने पगार होत नसल्याने कर्मचाºयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.विशेष म्हणजे, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एजंसीची नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्याची आर्थिक स्थिती नसताना त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी नियुक्त करण्याचे अधिकार कसे काय देण्यात आले हा मुद्दा देखील उपस्थित केला जात आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुळ वेतनापेक्षा पाच ते सात हजार रुपये कमी दिले जात असताना एजंसीवर कारवाही करण्याऐवजी नगर परिषदेचे पदाधिकारी व जिल्हा प्रशासन सुध्दा गप्प राहण्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार नसल्याने या कर्मचाऱ्यांवर उधार-उसनवारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. एवढा गंभीर प्रकार नगर परिषदेत घडत असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी कुणीही काहीच करीत नसल्याने नगर परिषद प्रशासन संवेदनाहिन झाल्याचेही हे कर्मचारी बोलत आहेत. पुढे नवरात्र, रामनवमी व गुढीपाडवा हे सण असून हे सुद्धा अंधारातच दिसून येत आहे.कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कुणीच वाली नाहीनगर परिषेदेचे कामकाज चालविण्यासाठी कंत्राटी कर्मचारी काम करीत असताना त्यांच्या पगारासाठी कुणीही काहीच करीत नसल्याचे चित्र आहे. मुख्याधिकारी बेमुदत रजेवर गेले असून त्यांच्या आशिर्वादानेच हे सर्व काही होत असल्याचे कर्मचारी बोलत आहेत. शिवाय पदाधिकारीही डोळे मिटून आहेत. तर दुसरीकडे कंत्राटदार कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून कामावरून काढण्याची धमकी देत आहे. अशात मात्र कर्मचाऱ्यांचा कुणीच वाली नाही. मात्र वेळीच यावर तोडगा न काढल्यास हे प्रकरण नगर परिषदेवर शेकण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी घेणार का दखलनगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या होत असलेल्या आर्थिक शोषणाबाबत लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह केली होती. मात्र अद्यापही कंत्राटदारावर कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे आतातरी जिल्हाधिकारी याची दखल घेणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका