शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भाडीपार गावात डेंग्यूसदृश आजाराचे थैमान

By admin | Updated: September 19, 2016 00:21 IST

तालुक्यातील बोदलबोडी ग्रामपंचायत अंतर्गत भाडीपार या गावात अज्ञात आजारामुळे दोन दिवसात दोन लोकांचा बळी गेल्यामुळे

सालेकसा : तालुक्यातील बोदलबोडी ग्रामपंचायत अंतर्गत भाडीपार या गावात अज्ञात आजारामुळे दोन दिवसात दोन लोकांचा बळी गेल्यामुळे भाडीपार गावासह संपूर्ण परिसरात एक दहशत पसरली आहे. तसेच या अज्ञात आजाराचा प्रकोप एवढ्या वेगाने वाढत चालला आहे. की आज गावातील ११ रुग्णांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात तर चौघांना गोंंदियाच्या केटीएस रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. तसेच सातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य चमू गावात दाखल झाली असून प्रत्येकाचे रक्त नमूने घेऊन औषधोपचार करीत आहे. आतापर्यंत या आजाराबद्दल नेमकी माहिती स्पष्ट झाली नसून हा आजार डेंग्यू आजार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. डेंग्यू जीवघेणा आजार असल्यामुळे सर्वत्र एकच दहशत पसरली आहे.भाडीपार हे गाव वाघनदीच्या काठावर आहे. तालुक्यात चार दिवसापूर्वीच अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीचा फटका भाडीपार गावाला सुद्धा बसला. गावात पुरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. पूर ओसरल्यानंतर गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. शनिवारी (दि.१७) गावातील दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विक्की मुनेश्वर खोटेले (१६) या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर रविवारी (दि.१८) ५४ वर्षीय महिला सयवंता इशुलाल गेडाम या महिलेला रुग्णालयात नेत असतानाच रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या दोघाच्या आजाराबद्दल नेमकी माहिती मिळाली नाही. परंतु गावात इतर लोकांनाही आजाराची लागण झपाट्याने होऊ लागली आणि संपूर्ण गाव हादरले. गावातील ११ रुग्णांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात भर्ती करण्यात आले. त्यापैकी सुगन हरिणखेडे (६०), सागर हरिणखेडे (६७), वर्षा खोटेले (१६) आणि जयवंता शेंद्रे (१८) या चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोंदियातील केटीएस जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.तर संगिता उईके (२०), दीक्षा हरिणखेडे (१५), संगीता हत्तीमारे (१९), तरासन हरिणखेडे (२५), मनिषा हरिणखेडे (२८), वर्षा हरिणखेडे (२०), रितू हत्तीमारे (१६) या रुग्णांचा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. आतापर्यंत गावातील ६० लोकांना ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार देण्यात आला आहे. गावात सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जे.डी. चाटे आपल्या चमूसोबत गावात दाखल झाले असून आरोग्य कॅम्प सुरू केला आहे. प्रत्येकाला औषधोपचार व रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान गावात औषध फवारणी व स्वच्छता मोहीम सुद्धा राबविण्यात येत आहे.तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी भाडीपार गावाला भेट दिली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आरोग्य विभागाला सतत निर्देश देत आहेत. दरम्यान बोदलबोडीचे सरपंच इसराम बहेकार, उपसरपंच नारायण गेडाम, भाजप तालुकाध्यक्ष परसराम फुंडे, मधू हरिणखेडे, ग्रामसेवक संतोष कुटे आदी गावात दक्षता घेत आहेत. ग्रामीण रुग्णालयातील डॉ. अरविंद खोब्रागडे व त्यांचे सहकारी दीपाली भामरे, ममता वाढई, दिपाली पटले, ममता लांजेवार, भीमा पटले, सागर राठोड, ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सतत औषधोपचार देत आहेत. (तालुका प्रतिनिधी)मरण पावलेल्या विक्की खोटेले या मुलाने रक्ताची उल्टी केल्याने डेंग्यूची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्याचे रक्ताचे नमूने घेता आले नाही. तर मरण पावलेल्या सयवंता गेडाम या महिलेचे नमूने घेण्यात आले आहेत. याशिवाय गावात १६० जणांची तपासणी करण्यात आली असून १४८ जणांना किरकोळ ताप आहे. त्यातील १० जास्त ताप असलेल्या १० लोकांचे नमूने घेतले आहेत व त्यात विक्कीचे नातेवाईक आहेत. तसेच संपूर्ण गावात तपासणी करण्यात आली असून फॉगींग सुरू झाली आहे. तर उद्या फवारणी केली जाईल. आरोग्य विभागाकडून कॅम्प लावण्यात आला असून स्थिती नियंत्रणात आहे. - डॉ. श्यामसुंदर निमगडे जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया