शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

जिल्ह्यात ठिकठिकाणी दंडार व मंडई

By admin | Updated: November 4, 2016 01:36 IST

जिल्ह्यात दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ठिकठिकाणी दंडार या लोककलेचे सादरीकरण करण्यात आले.

गोंदिया : जिल्ह्यात दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ठिकठिकाणी दंडार या लोककलेचे सादरीकरण करण्यात आले. अनेकांनी गोवर्धन पूजन गार्इंची सजावट करून स्पर्धेत पुरस्कारही मिळविले.दंडार ही लोककला ग्रामीण जिवनाचे दर्शन तिरोडा : १ नोव्हेंबरला जय बजरंग नाट्य मंडळच्या वतीने बयवाडा येथे मंडईनिमित्त सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत दंडार उत्सव व रात्री दुय्यम तमाशा सादर करण्यात आला. अध्यक्षस्थानी पं.स. सदस्य जया धावडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संजय किंदरले, मुख्याध्यापक रामसागर धावडे, शिवकुमार शेंडे, पोलीस पाटील कल्पना मलेवार, सरपंच उर्मिला बेलपोंडे, उपसरपंच नामदेव आदमणे, ग्रा.पं. सदस्य जगदिश मलेवार, किशोर मलेवार, सरपंच संतोष बावणकर, विजय मलेवार, उदाराम मरघडे आदी उपस्थित होते. या वेळी जया धावडे यांनी आपल्या जिल्ह्यातील दंडार ही लोककलेतून ग्रामीण जीवनाचे दर्शन घडते. दंडारीत गावचे भाजी विक्रेते, गावातील सफाईवाले, गावातील भोंदूबाबा, आस्वल, कोल्हे, वाघ व इतर प्राणी गावात असतात व भारत पाकिस्थान लढाईचे दर्शन दंडारीत घडविले जातात. वीर पुरुषांचे बलिदान, शिवाजी महाराज यांचे जीवन गौरव मोठ्या प्रमाणात तमाशात सादर केल्या जातात. लोककलेचे जतन आजही गावात होते, असे त्या आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या. तसेच पंचम बिसेन यांनी आम्ही जनतेचे सेवक असून जनतेची सेवा हेच आपले कार्य आहे, असे बोलले. इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी वानूजी मलेवार, योगराज मलेवार, सेवक मरघडे, चैतराम मलेवार, नत्थू बावणकर, अनिल बावणकर, खुशाल बावणकर, युवराज शेंदरे, धनराज भुरे, विलास मलेवार, तुलाराम मरघडे, गोविंदा मलेवार, देवाजी फुलबांधे, रामचंद्र आंबीलकर, महादेव मणेवार, नामदेव भुरे, वामन भिवगडे व सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. संचालन दीपक मरघडे यांनी केले. आभार किशोर मलेवार यांनी मानले. दंडार नृत्याने मंडईमध्ये जोश बोंडगावदेवी : येथील मंडईच्या निमित्ताने गावागावातून आलेल्या विविध प्रकारच्या दंडारींनी अख्या गावामध्ये विविध वेशभूषा परिधान करून डफलीच्या तालावर नृत्य सादर करून गावकऱ्यांचे व मंडईमध्ये आलेल्या पाहुण्याचे मनसोक्त मनोरंजन केले. आकर्षक वेशभूषेसह घुंगराच्या आवाजाच्या साथीने सादर केलेल्या दंडार नृत्याने मंडईमध्ये जोश भरल्याचे चित्र दिसत होते. आलेल्या दंडार मंडळांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने खास व्यवस्था करण्यात आली होती. भाऊबीजेच्या दिवसापासून परिसरात सर्वत्र मंडईच्या हंगामाला मोठ्या उत्साहाने सुरूवात झाल्याचे चित्र दिसत आहे. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी गावात मंडईचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण तालुुक्यात येथील मंडई नावाजलेली असल्याने दूरवरचे आप्तस्वकीय, नातेवाईकांचे आगमन मोठ्या संख्येने गावात झाले.परिसरातील बोदरा, विहीरगाव, देऊळगाव, खांबी, चान्ना, बाक्टी आदी गावातील तसेच गावातील हौशी कलावंतांनी डफरीच्या व नाद मृदंगाच्या तालावर दंडारीचे आकर्षक नृत्य सादर केले. दुपारच्या ३ वाजेपासून मंडईचा ज्वर चढू लागला. बाहेरगावावरून आलेल्या पाहुण्यांचे घरोघरी आगमन झाले. दंडारी मंडळाच्या कलाकारांनी गावात घरोघरी दर्शन देऊन नृत्य सादर केले व आपला इनाम प्राप्त केला. स्थानिक ग्रामपंचायतच्या वतीने मंडईमध्ये स्वतंत्र जागेत जागा उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्येक दंडारीने आपल्या आकर्षक कलेने डफलीच्या तालावर दंडार नृत्य सादर करून प्रेक्षकांना रिझवून सोडले. दंडार नृत्य सादर करणाऱ्या कलाकारांना पानविडा व बक्षीस देऊन ग्रामपंचायतच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. येथील मंडईनिमित्त परिसरातील गावातसुध्दा पाहुण्यांची रेलचेल जाणवत होती. येथील प्रत्येकांच्या घरी पाहुण्यांची वर्दळ प्रकर्षाने दिसत होती. दंडार नृत्याने मंडईत एक उल्हासपूर्ण जोश दिसत होता. सध्या मंडईनिमित्त आलेल्या पाहुण्यांची चांगलीच आवभगत केली जात आहे. त्यामुळे पसिरात नवनवीन चेहरे दिसून येत आहेत.