शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने धानपिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 21:55 IST

जिल्ह्यातील काही भागात शनिवारी (दि.२१) रात्रीच्या दरम्यान आलेल्या वादळी पावसामुळे ८०० हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा प्राथमिक अंदाज : शेतकºयांना आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील काही भागात शनिवारी (दि.२१) रात्रीच्या दरम्यान आलेल्या वादळी पावसामुळे ८०० हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आले आहे. वादळी पावसाने धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ओरड जिल्ह्यातील शेतकºयांची आहे. त्यामुळे नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शनिवारी (दि.२१) रात्रीच्या सुमारास वादळी वाºयासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेकडो हेक्टरमधील धान अक्षरक्ष: झोपल्या गेले. रात्रभर धानाची लोंब पाण्यात राहिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात दरवर्षी १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. मात्र यंदा कमी पाऊस झाल्याने ७० हजार हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. त्यामुळे उर्वरित १ लाख १५ हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यंदा कमी पाऊस झाल्यानंतरही शेतकºयांनी कशी बशी धानाची रोवणी करुन पिके जगविण्याचा प्रयत्न केला. महिनाभरानंतर धान कापणीला येणार असतानाच त्याला वादळी पावसाचा फटका बसल्याने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला. कमी पाऊस झाला असतानाही शेतकºयांनी रक्ताचे पाणी करुन पिके वाचविली. मात्र त्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. पावसाअभावी आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकºयांना अस्मानी संकटाचा फटका सहन करावा लागला. वादळी पावसामुळे सर्वाधिक पिकांचे नुकसान अर्जुनी-मोरगाव तालुक्यात झाले. या तालुक्यातील ६३७ हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. मात्र उर्वरित तालुक्यात सुध्दा वादळी पावसामुळे धानपिकांचे नुकसान झाले असून ८०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान शेतकºयांची ओरड वाढल्यानंतर कृषी विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले. पालकमंत्री बडोले यांनी देखील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील काही शेतांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली.नुकसान भरपाईची मागणीवादळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे कृषी विभागाने नुकसानीचे योग्य सर्वेक्षण करुन आर्थिक मोबदला देण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.कीडरोगांचा प्रादुर्भावउष्ण दमट वातारणामुळे धानपिकांवर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी हजारो हेक्टरमधील धानपिक धोक्यात आले आहे. कीडरोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके खरेदी करुन फवारणी करित आहेत. मात्र यानंतरही कीडरोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हैराण असल्याचे चित्र आहे.