शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कपातीची कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

या कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावर ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार असून नवीन आदेश काढून त्यांचा दुसऱ्या योजनेत समावेश केला जाणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री व पाणी पुरवठा मंत्र्यांशी झालेल्या चर्चेत या कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत न करता त्यांना सेवेत कायम करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली.

ठळक मुद्देशासनाने दिले सेवा समाप्तीचे आदेश : दोन हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जि.प.पाणी व स्वच्छतेत उत्कृष्ट कामिगरी करणाऱ्या राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३१ जुलैपासून सेवामुक्त करण्याचे आदेश काढले आहे. या आदेशामुळे या विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करु नये असे शासनाचे धोरण आहे. मात्र शासनाने स्वत:च या धोरणाला हरताळ फासत राज्यातील दोन हजार कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे आदेश दिल्याने त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.या कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावर ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार असून नवीन आदेश काढून त्यांचा दुसऱ्या योजनेत समावेश केला जाणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री व पाणी पुरवठा मंत्र्यांशी झालेल्या चर्चेत या कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत न करता त्यांना सेवेत कायम करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली. यावर पाणी पुरवठा मंत्र्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या वेळी आ.मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे आणि अधिकारी उपस्थित होते. पाणी व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र म व जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद व तालुक्याच्या पंचायत समितीच्या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. आजघडीला त्यांची संख्या सुमारे दोन हजारांच्या घरात आहे.या कर्मचाऱ्यांनी आयुष्याची उमेदीची वर्षेे घालवली, हागणदारीमुक्त आणि स्वच्छतेसाठी आटापिटा केला. गुडमॉर्निंग पथकासाठी पहाटेपासून गावोगाव पिंजून काढले, स्वच्छतेबाबत गावस्तरावर स्वच्छता विषयक जनजागृतीचे काम केले. अशा कर्मचाऱ्यांना घरी बसविण्याचा घाट शासनाने घातला आहे. यातील अनेक कर्मचारी वयाची पन्नासी ओलांडलेले आहेत.या सर्व कर्मचाऱ्यांचे संसार आता मोडकळीस येणार आहे.या कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामिगरीच्या बळावर अनेक अधिकाºयांना पदोन्नती प्राप्त झाली. परंतु, ज्यांनी पाणी आणि स्वच्छतेत भरीव काम केले अशा कर्मचाऱ्यांना मात्र सेवामुक्तीचा बहुमान मिळाल्याने सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद