शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
4
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
5
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
6
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
7
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
8
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
9
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
10
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
11
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
12
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
14
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
15
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
16
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
17
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
18
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
19
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
20
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...

तलावातील बेटांमुळे सारसांचे संवर्धन

By admin | Updated: November 5, 2016 01:22 IST

बोड्या व तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सारस संवर्धनासाठी शर्यतीचे प्रयत्न केले जात आहे.

तलावातील बेशरम नष्ट : वनालगतच्या तलावांत गाळ पेरणी बंद करागोंदिया : बोड्या व तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सारस संवर्धनासाठी शर्यतीचे प्रयत्न केले जात आहे. सारसापासून मनूष्य किंवा प्राणी दूर राहावेत यासाठी सारसांचे अधिष्ठाण असलेल्या तलावांच्या मध्यभागी बेट तयार करून त्यांचे संवर्धन केले जात आहे. या बेटावर सारसाने अंडी घातल्यास त्या अंडी पर्यंत कुणाला पोहचता येणार नाही. प्राणीही त्यांच्यापर्यंत पोहचणार नाही.गोंदिया जिल्ह्यात स्थलांतरीत पक्षी येतात म्हणजेच गोंदिया जिल्ह्यातील तलावांची स्थिती चांगली आहे. परदेशात बर्फ पडते तेव्हा पक्ष्यांना खाद्य कमी पडते म्हणून ते आपल्या देशात खाद्य शोधण्यासाठी येतात. ज्या बोड्या तलावाता खाद्य मिळते त्यात ते वास्तव्य करतात. आपल्या तलावांमध्ये गाद, खस, चिला, एक्वेटी प्लांटमध्ये मूळाला खोदून खातात. कमलकंद, कमलगट्टे, बोळुंदा हेच खाद्य सारसालाही लागते. स्थलांतरीत पक्ष्यांच्या अधिवासाच्या ठिकाणी सारस येतात. अंडी घालने, बच्चे पालने धानाच्या शेतात करतात. तेव्हा त्यांना किटक, छोटे साप, सरडे पिल्लांना भरवायला मिळतात. त्यामुळे त्या पिल्लांची वाढ होते. शेतातच मालगुजारी तलाव असल्याने या तलवांत असलेल्या बेटाचा फायदा सारसांना होतो. रात्री विश्रांती घेतांना बेटाची फार आवश्यकता असते. कारण बेट असेल तर त्यांना सुरक्षीत वाटते. फिडींग करताना आजूबाजूला कुणी दिसले तर ते बेटाचा वापर करतात. माणूस, वन्यप्राणी यापासूनही सारस आपली अंडी व पिल्लांचा बचाव करतात. परसवाडा तलावावर बेट तयार करण्यात आला. झिलमीली तलावावर बेट तयार करण्यात येणार आहे. तलावात मधल्या भागात एक बेट असावे. नवेगावबांधच्या श्रृंगारबोडीतही बेट केला आहे. इतर सात ते आठ तलावांमध्ये बेट तयार करण्यासाठी शासनाकडे मागणी केली आहे असे मुकुंद धुर्वे यांनी सांगितले. तलावातील बेशरममुळे अन्न शोधायला पक्ष्यांना कठीण जाते व शिकाऱ्यांना लपायला संधी मिळते. त्यामुळे बेशरमची झाडे काढणे आवश्यक आहे. मानवाच्या हस्तक्षेपाने व अतिक्रमणाने दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी व्हायला लागली. हा मोठा प्रश्न आता पक्षी मित्रांना विचार करायला भाग पाडत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घटकांनीे आज आहे त्याच परीस्थितीत जतन करण्याचे ठरविले. प्रत्यक्षात कृती सुरू असल्याने पुन्हा गतवैभव प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. तलावाच्या आजूबाजूला असलेल्या गावातील काही लोक आर्थिक फायद्यासाठी तलावातून कमळनाल मोठ्या प्रमाणात काढून विकतात. त्यांचा ग्राहक वर्ग वाढल्याने समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याच वनस्पती वर अनेक पाणपक्षी आपली घरटी तयार करतात. त्यावर वास्तव्य करणारे अनेक किटक या पाणपक्ष्यांना व त्यांचा पिल्यांना खायला मिळतात. पाण्यावर त्या वनस्पतींच्या पाणाची आच्छादन मिळाल्याने पाणी गरम न होता त्यांना आवश्यक असलेले तापमान कायम राहते. शिकारी पक्ष्यांपासून त्यांच्या पिल्यांचे रक्षण करायला मदत होते. पूर्ण तलावाच्या भागापैकी काही भाग पक्ष्यांसाठी सुरक्षित करून अल्प प्रमाणात लोकांना परवानगी देवून त्या पक्ष्यांच्या संरक्षणाची संपूर्ण जवाबदारी सोपविण्याची गरज असते. सारस संवर्धनासाठी निसर्ग मंडळाचे अध्यक्ष चेतन बजाज, सचिव अशोक पडोळे, संजय आकरे, उमेंद्र भेलावे व इतर वन्यप्रेमीकडून प्रयत्न केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)