शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दुष्काळात पिकविली धानाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:05 IST

यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. कमी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हाती आलेले धानपिक गमाविण्याची वेळ आली.

ठळक मुद्देजैविक खतांचा वापर : देवानंदने ठेवला शेतकºयांपुढे आदर्श

हितेश रहांगडाले।ऑनलाईन लोकमत वडेगाव : यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. कमी पावसामुळे बºयाच शेतकºयांना हाती आलेले धानपिक गमाविण्याची वेळ आली. मात्र तिरोडा तालुक्यातील बोरगाव येथील एका शेतकºयांने कमी पाण्यात आणि दुष्काळी परिस्थितीत धानाचे उत्पादन घेतले. त्यांच्या यशस्वी प्रयोगामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आशेचा एक नवा किरण गवसला आहे.दुष्काळी परिस्थितीत धानपिकाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करणाºया शेतकºयाचे नाव देवानंद रंगनाथ बोपचे (४८) रा. बोरगाव (वडेगाव) असे आहे. त्यांनी त्यांच्या केवळ एक एकर शेतीत अल्प पावसात धानपिकाचे उत्पादन घेऊन इतर शेतकºयांपुढे आदर्श ठेवला आहे. यंदाच्या खरीप हंगामात अर्धा अधिक पावसाळा संपल्यानंतर पुढे पाऊस पडण्याची शक्यता कमीच होती.आॅगन्ट महिना उलटत असताना सर्वच शेतकºयांची धानाची रोपे (खारी) उन्हामुळे वाळली. अशा विपरित परिस्थितीत बोपचे यांनी त्यांच्या काही शेतकरी मित्रांच्या सल्ल्यानुसार २३ आॅगस्ट रोजी त्याच्या शेतात ट्रॅक्टच्या सहाय्याने रोटावेटर लावून नांगरणी केली.माती भुसभुसीत झाल्यावर धानाची शेतावर पेरणी करुन आवत्या टाकल्या. त्याने अंतराने पडलेल्या नैसर्गिक पावसाने शेतातील पीक जोमात आले. मजुरांच्या सहाय्याने शेतातील तण काढल्यानंतर धानपिकाची झपाट्याने वाढ झाली. यासाठी त्यांनी कुठलेही रासायनिक खत, औषध व किटकनाशकांचा वापर केला नाही.शेतात आधीपासूनच टाकलेल्या शेणखताने पीक बहरले. सगळीकडे शेतकरी संकटात असताना देवानंदने एक एकर शेतीत १३ पोती धानाचे उत्पादन घेतले. त्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगाची जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये चांगलीच चर्चा आहे.शेतकरी मित्रांचा सल्ला पडला उपयोगीदेवानंद बोपचे यांचे काही मित्र जैविक शेती करतात. तसेच ते आवत्या पध्दतीने धानाची लागवड करतात. कमी पावसाचा आवत्या धानावर फारसा परिणाम होत आहे. शिवाय रासायनिक खताऐवजी जैविक खत दिल्याने पिकांची वाढ चांगली होते. शिवाय शेतीच्या लागवड खर्चात सुध्दा बचत करणे शक्य असल्याचा सल्ला देवानंदला दिला. त्यांनी हाच सल्ला आत्मसात करुन यंदा धानाची शेती केली. त्यामुळे त्यांना दुष्काळी परिस्थितीत देखील धानाचे चांगले उत्पादन घेणे शक्य झाले.शेतकऱ्यांनी शेतीच्या लागवड पध्दतीत बदल केल्यास लागवड खर्चात बचत करण्यास मदत होईल. शेतकºयांनी रासायनिक खतांऐवजी जैविक खतांचा वापर केल्यास उत्पादन वाढविण्यास निश्चित मदत होईल.- देवानंद बोपचे,प्रयोगशिल शेतकरी