शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

पीक परिस्थितीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 01:02 IST

जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने केवळ ५१ टक्केच रोवणी झाली आहे. त्यामुळे पिकांची स्थिती बिकट असून जमिनीला भेगा पडल्या आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्री बडोले : शेतकºयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने केवळ ५१ टक्केच रोवणी झाली आहे. त्यामुळे पिकांची स्थिती बिकट असून जमिनीला भेगा पडल्या आहेत. लावलेली रोपे वाळत चालली आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेले असताना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.त्यांनी ५ व ६ आॅगस्ट रोजी गोरेगाव, सडक-अर्जुनी आणि अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक शेतकºयांच्या शेतीला भेट देवून प्रत्यक्ष पीक परिस्थितीची पाहणी केली. पालकमंत्र्यांच्या या भेटीमुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथे झनकलाल चौरागडे व मुलचंद भावे या शेतकºयांच्या धान पिकांची पाहणी करून त्यांच्याशी चर्चा केली. चौरागडे हे कृषी विभागाच्या योजनेतून तयार केलेल्या शेततळ्यातून धानाला पाणी देत होते. तर भावे या शेतकºयाने समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पेरणीच केली नसल्याचे सांगितले.हिरापूर येथील पुष्पा बोपचे यांच्या शेतातील धान नर्सरीची पाहणी केली. कमी पावसामुळे नर्सरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब शेतकºयांनी त्यांना सांगितली. त्यामुळे रोवणी करताना अडचणी येणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले.या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय अधिकारी तळपाळे, पं.स. सभापती दिलीप चौधरी, उपसभापती बबलू बिसेन, जि.प. सदस्य विश्वजीत डोंगरे, डॉ.लक्ष्मण भगत, पं.स. सदस्य केवलराम बघेले, पुष्पराज जनबंधू, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, संजय बारेवार, माजी सरपंच सतीश रहांगडाले आदी उपस्थित होते.पालकमंत्र्यांनी कुºहाडी येथील महा ई-सेवा केंद्राला भेट देवून पीक विमा योजनेच्या आॅनलाईन किती अर्जांची नोंदणी झाली व आॅनलाईन नोंदणी करताना येणाºया अडचणी सेवा केंद्राचे संचालक भुमेश्वर पटले यांच्याकडून जाणून घेतल्या.सडक-अर्जुनी तालुक्यातील पाटेकुर्रा येथील शेतकरी सकू नेवारे यांच्या शेतात धानिपकांची पाहणी केली. कमी पावसामुळे उत्पादनात मोठा फरक पडणार, असे शेतकºयांनी सांगितले. काही शेतकºयांनी अद्याप रोवणी केली नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणी येतील, असे सांगितले.पाटेकुर्राचे शेतकरी लेखीराम वरखडे, थाडू राणे यांच्याशी पालकमंत्र्यांनी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषी अधिकारी तुमडाम, विजय बिसेन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. भुमेश्वर पटले, सरपंच चेतन वडगाये उपस्थित होते.पळसगाव-डव्वा येथील रूपविलास कुरसुंगे यांच्या पिकांची पाहणी केली. जांभळी येथील काही शेतकºयांच्या पीक परिस्थितीची पाहणी केली.बाक्टी येथील शेतकºयांशी त्यांनी संवाद साधून चान्ना येथील गजानन महाराज मंदिरात शेतकºयांशी पीक परिस्थितीबाबत चर्चा केली. शेतीला सिंचनासाठी २४ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. भारिनयमनामुळे नुकसान होणार नाही याची काळजी घेणार, असे त्यांनी आश्वासन दिले. बोंडगावदेवी येथे हेमराज बोरकर, यादवराव बरैया, माधव बरैया, सिध्दार्थ साखरे, गणेश वालदे, विनोद वालदे, विजू मानकर, संजय मानकर यांच्या शेतीची पाहणी करून नुकसान झाले तर शासन मोबदला देईल, याची ग्वाही दिली.शेतकºयांना विम्याचा लाभ मिळेलखांबी येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात उपस्थित शेतकºयांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. या वेळी पालकमंत्री म्हणाले, पाऊस कमी झाल्यामुळे पीक परिस्थितीची पाहणी करताना केवळ ४५ टक्के पाऊस झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. तलावात केवळ १८ टक्के जलसाठा आहे आणि चार दिवसांत मोठ्या प्रमाणात जिल्ह्याातील शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हप्ता भरला आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना पीक विमा योजनेचा निश्चित लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले.‘त्या’ अपघातातील मृत व जखमींना मदतअर्जुनी-मोरगाव तालुक्यातील मुंगलीटोला येथील शाळेतील विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी दूध घेवून जाणाºया वाहनाने धडक दिली. या अपघातात कल्याणी कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात जखमी झालेले हर्षा कापगते, योगेश कापगते, रोहिणी डोंगरवार, बादल मेश्राम यांचीही विचारपूस केली. मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी असलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. अपघातात मृत्यू पावलेल्या कल्याणी कांबळे या विद्यार्थिनीच्या पालकाला राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेतून तसेच जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आमदार निधीतून मदत करणार असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी विविध कुटुंबांना सांत्वन म्हणून वैयक्तीकरित्या प्रत्येकी १० हजार रूपयांची मदत केली.