शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

नकली दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST

गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री ११.४५ वाजता हलबीटोला येथील बनावट दारूच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली.  दारू बनविण्याचा कोणताही वैध परवाना नसताना सुद्धा मानवी जीवितास धोका उत्पन्न येईल  यांची पूर्व जाणीव असूनही नशाकारक व अपथ्यकारक रसायन व फ्लेवर वापरून अवैधरीत्या बनावटी दारू तयार करून ते परवाना युक्त दारूसारखी नकली दारू तयार करीत होते.

ठळक मुद्दे६.७४ लाखांचा माल जप्त : पाच जणांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :   हलबीटोला येथील अशोक हुपराम गिऱ्हेपुंजे या शेतकऱ्याच्या शेतात बनावट देशी दारू करून त्याचा पुरवठा जिल्हाभरात करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घातली. गुरुवारी (दि.१८) रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत सहा लाख ७४ हजार ७१० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री ११.४५ वाजता हलबीटोला येथील बनावट दारूच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली.  दारू बनविण्याचा कोणताही वैध परवाना नसताना सुद्धा मानवी जीवितास धोका उत्पन्न येईल  यांची पूर्व जाणीव असूनही नशाकारक व अपथ्यकारक रसायन व फ्लेवर वापरून अवैधरीत्या बनावटी दारू तयार करून ते परवाना युक्त दारूसारखी नकली दारू तयार करीत होते. आरोपी हेमंत बन्सीलाल पद्माकर (४२, रा. गोरेगाव) याने हलबीटोला शेतशिवारातील अशोक हुपराम गिऱ्हेपुंजे (रा. महावीर कॉलोनी, गोरेगाव) यांच्या मालकीचे घर करार तत्त्वावर घेऊन त्याचा वापर बनावट देशी-विदेशी दारू कारखान्यासाठी करीत होता. या कामासाठी  आरोपी कामगार हनीफ रमजान शेख (४२), मेहताब नादरखाँ पठाण (३८), नजीर ईसराईल सय्यद (३०), आशिकअली सवालशाह सय्यद (३०, सर्व रा. कुऱ्हाडी) हे अवैध दारू गाळत होते. ती दारू देशी-विदेशी दारूच्या बाटल्यात भरून लोकांना सेवन करण्यासाठी पॅकिंग करून ठेवलेली होती. सोबत देशी-विदेशी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण सहा लाख ७४ हजार ७१० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. या संदर्भात आरोपींवर १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भादंविच्या कलम ३२८ सहकलम ६५ (ई)(फ), ६७,८३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर आरोपींना रात्री ८.४७ वाजता अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, सूर्यभान जाधव, संगीता कडव व इतरांनी केली आहे.

एवढा माल पकडला याप्रकरणात बनावटी देशी-विदेशी दारू तयार करण्यासाठी तयार करण्यात येणारे रसायन, एक लाख २७ हजार २०० रूपये किमतीचे गोवा व्हिस्कीचे लेबल लावलेल्या बनावटी दारूच्या १६ पेट्या, ४८ पव्वे असलेल्या १७ पेट्या, मॅकडाॅवेल्स नं. - १ लेबल लावलेल्या बनावटी इंग्रजी दारूचे ३१ पव्वे, रॉयल स्टॅगचे लेबल लावलेले बनावटी १८ नग पव्वे, फिरकी संत्रीचे लेबल लावलेल्या बनावटी देशी दारूचे १५० पव्वे जप्त करण्यात आले.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस