शहरं
Join us  
Trending Stories
1
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
4
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
5
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
6
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
7
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
8
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
9
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
10
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
11
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
12
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
13
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
14
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
15
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
16
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
17
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
18
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
19
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
20
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
Daily Top 2Weekly Top 5

घराघरात कार्यकर्ते तयार करा

By admin | Updated: December 23, 2014 23:07 IST

भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीयतेची विचारधारा जनमानसांत रुजलेली आहे. पक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या सदस्यता मोहीमेत कार्यकर्त्यांनी आपल्या क्षेत्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून घराघरांत

राजकुमार बडोले : भाजपच्या जिल्हा बैठकीत आमदारांचा सत्कारआमगाव : भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीयतेची विचारधारा जनमानसांत रुजलेली आहे. पक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या सदस्यता मोहीमेत कार्यकर्त्यांनी आपल्या क्षेत्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून घराघरांत पक्षाचा कार्यकर्ता तयार करावा व त्याला देशाच्या परिवर्तनात सहभागी करून घ्यावे. देशात परिवर्तनासाठी भारतीय जनता पक्षाला सशक्त करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ते आमगाव येथील लक्ष्मणराव मानकर फॉर्मसी महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी २१ डिसेंबर रोजी आयोजित भाजपच्या जिल्हा विस्तारीत बैठकीत बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते. यावेळी प्रामुख्याने आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी आ. केशव मानकर, माजी आ. हेमंत पटले, माजी आ. खुशाल बोपचे, माजी आ. भेरसिंह नागपुरे, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जिल्हा संघटनमंत्री आशिष वांदिले, प्रदेश सदस्य राकेश शर्मा, अशोक इंगळे, नेतराम कटरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रचना गहाणे, जेष्ठ कार्यकर्ते गोविंदराव पुंड, जि.प. सभापती कुसन घासले, सविता पुराम, मोरेश्वर कटरे, महिला मोर्चा अध्यक्ष सीता रहांगडाले, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, दीपक कदम, सुभाष आकरे आदी उपस्थित होते. ना. राजकुमार बडोले, आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले यांचा जिल्हा भाजपतर्फे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी आ. हेमंत पटले यांचा विधानसभेतील संसदीय योगदानाबद्दल राज्य शासनातर्फे गौरव करण्यासाठी निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सभेत मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष अग्रवाल म्हणाले, २५ डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण देशात राष्ट्रीय सुशासन दिवस पाळला जाणार आहे. या दिनानिमत्त प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बुथ व परिसरात स्वच्छता मोहीम व इतर उपक्रम राबवायचे असून सदस्यता मोहीम बुथ व वॉर्डात राबवायची आहे. याप्रसंगी आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, माजी आ. हेमंत पटले, सुभाष आकरे, सीता रहांगडाले, जयंत शुक्ला यांनीही आपले मत मांडले. सभेचे संचालन जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी केले. सभेचे संचालन अहमद मनियार, नंदकुमार बिसेन, रघुनाथ लांजेवार, शामलाल शिवणकर, येसुलाल उपराडे, बाबा लिल्हारे, छत्रपाल तुरकर, गजानन डोंगरवार, भाऊराव उके, श्रावण राणा, प्रदीपसिंग ठाकुर, मिनू बडगुजर, प्रवीन दहिकर, सविता इसरका, रुपाली टेंभुर्णे, चित्रलेखा चौधरी, योगेश्वरी पटल व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)