खातिया : तालुक्यातील खातिया येथील शेतकरी मेहतर गिऱ्हेपुंजे यांचा गोठा पडल्यामुळे एक गाय मरण पावली तर एक गोऱ्हा जखमी झाला. ही घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.या घटनेची माहिती मिळताच रावणवाडी या ठाण्याचे सहायक पो.निरीक्षक एच.जी.शेख व धिरज तिवारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी खातियाचे उपसरपंच सुरजलाल खोटेले, पोलीस पाटील विनायक राखडे उपस्थित होते. गोठ्यामध्ये एकूण सहा जनावरे होती. अशा या घटनेमुळे त्या शेतकऱ्याचे मोेठे नुकसान झाले आहे. ही घटना घडण्याच्या दोन दिवसापूर्वी पाऊस आला होता. शासनाच्या वतीने त्या शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे. या भागात आधीच शेतकऱ्यांच्या धानपिकावर संकट असताना त्यांना हा फटका बसला.खातिया येथील उपसरपंच सूरजलाल खोटेले यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदतीची मागणी केली आहे.(वार्ताहर)
जनावरांचा गोठा पडल्याने गाय ठार, गोऱ्हा जखमी
By admin | Updated: September 7, 2016 00:40 IST