शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या धडकेत दाम्पत्य जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

पत्नीला सोबत घेऊन अरुण काळसर्पे गावापासून २ किलोमीटर अंतरावर (गवळी देव) येथे येताच झाडावर बसलेल्या बिबट्याने झाडावरून उडी मारली. ध्यानीमनी नसताना बिबट मोटारसायकलच्या समोर आडवा आल्याने दोघेही मोटारसायकलवरून कोसळून पडल्याने गंभीर जखमी झाले.  जंगल शिवारात लाकूड तोडणाऱ्या मजुरांनी धाव घेतली व त्या दोघांना रुग्णवाहिकेतून अर्जुनी-मोरगाव येथे ग्रामीण रुग्णालयात नेले.

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी :   बोदरा (देऊळगाव) या आपल्या राहत्या गावावरून लग्नकार्यासाठी आसोली येथे मोटारसायकलने जात असताना गावापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावरील बोदरा राखीव वनात (गवळी देव) बिबट्याने रहदारीच्या रस्त्यावर येऊन त्यांना जबरदस्त धडक दिल्याने दोघे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. रविवारी (दि. ६) सकाळी ११ वाजेदरम्यान ही घटना घडली. आत्माराम काळसर्पे (५४) व प्रतिभा अरुण काळसर्पे (४५) असे जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत कार्यरत बोदरा निवासी अरुण काळसर्पे हे पत्नी प्रतिभासोबत नातलगताच्या लग्नकार्यासाठी आसोली (महागाव) येथे जाण्यासाठी मोटारसायकलने बोदरा-अर्जुनी-मोरगाव मार्गावरून सकाळी ११ वाजतादरम्यान निघाले. हा मार्ग जंगल शिवारातून जात असून बोदरा बीटातील राखीव वन कम्पार्टमेंट क्रमांक- २७९ हा भाग वन्यप्राण्यांच्या वास्तव्याचे ठिकाण म्हणून ओळखला जातो. या मार्गावर वन्यप्राण्यांचा नेहमी वावर असतो. पत्नीला सोबत घेऊन अरुण काळसर्पे गावापासून २ किलोमीटर अंतरावर (गवळी देव) येथे येताच झाडावर बसलेल्या बिबट्याने झाडावरून उडी मारली. ध्यानीमनी नसताना बिबट मोटारसायकलच्या समोर आडवा आल्याने दोघेही मोटारसायकलवरून कोसळून पडल्याने गंभीर जखमी झाले. जंगल शिवारात लाकूड तोडणाऱ्या मजुरांनी धाव घेतली व त्या दोघांना रुग्णवाहिकेतून अर्जुनी-मोरगाव येथे ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांच्यावर त्वरित उपचार केले असून दोघेही धोक्याबाहेर आहेत. घटनेची माहिती मिळताच बोंडगावदेवी सहवनक्षेत्राचे क्षेत्र सहायक वासुदेव वेलतुरे, वनरक्षक डी. डी. कोकाटे, दिनेश मुनेश्वर, सतीश राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली. तसेच ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. बिबट्याच्या धडकेत जखमी झालेल्या पती-पत्नीला त्वरित आर्थिक मोबदला देण्याची मागणी ग्रामवासीयांनी केली.

परिसरात बिबट्याची दहशत - दिवसाढवळ्या गावकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने बोदरा, देऊळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत पसरली आहे. त्यात शनिवारी (दि. ५) भरदुपारी बिबट्याच्या एका बछड्याचे चक्क गावात दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती संचारली आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरीत आहे.

 

टॅग्स :leopardबिबट्याAccidentअपघात