शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

देशाला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:23 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू एकता आणू पाहात आहे. पण त्यांच्या हिंदू एकतेत दलित, मुस्लीम, महिलांना स्थान नाही. देशात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना देशाचा चौकीदार मात्र गप्प आहे. आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते ते जनरल डायरने घडविले होते.

ठळक मुद्देमोहित पांडे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू एकता आणू पाहात आहे. पण त्यांच्या हिंदू एकतेत दलित, मुस्लीम, महिलांना स्थान नाही. देशात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना देशाचा चौकीदार मात्र गप्प आहे. आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते ते जनरल डायरने घडविले होते. तर मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकरी आंदोलनावर गोळीबार करुन भाजप सरकारने देशात जनरल डायर अस्तित्वात असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे देशाला संघाच्या संविधानाची नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची खरी गरज असल्याचे मत जेएनयुचे विद्यार्थी नेते मोहित पांडे यांनी शुक्रवारी (दि.१३) येथे व्यक्त केले.गोंदिया येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने शुक्रवारी (दि.१३) तहसील कार्यालयासमोरील पटागंणावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष धीरज मेश्राम होते. या वेळी जेएनयुच्या विद्यार्थी नेत्या शेहला रशीद, यवतमाळचे रमेश जीवने, मिलिंद गणवीर, अनिल रामटेके, निलेश देशभ्रतार उपस्थित होते. पांडे म्हणाले, ग्रामीण भागातील वंचित मुलांना चांगले उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी बाबासाहेबांनी जेएनयुसारखे शैक्षणिक केंद्र असावे अशी त्यांची विचारधारा होती. मात्र आज बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्र ांतीलाच लगाम लावण्याचे काम सुरु असल्याचा आरोप केला. शिक्षणाची दारेच बंद करण्याचे काम केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार करीत असल्याची टिका केली. जेएनयुमधील शिक्षणाच्या सुविधा बंद करु न गरीब सामान्य घरातील मुलांच्या उच्च शिक्षणाला लगाम लावण्याचे काम जोमात सुरु झाले आहे. तर दुसरीकडे मन की बात सांगून लोकांना दिशाभूल करणारे प्रधानसेवक मात्र त्यांच्या डोळ्यासमोर होणाऱ्या शेतकरी आत्महत्या विसरले आहेत. शैक्षणिक अत्याचारात रोहीतची हत्या करून आंतक निर्माण करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारने केला आहे. अल्पसंख्याक, दलित व महिला हे एकत्र येऊ नये, अशी विचारधारा असलेली संघटना नागपूरात आहे. ती म्हणजे आरएसएस होय.नाथुरामच्या समोरील राम हटवू शकले नाही पण बाबासाहेबांच्या नावात राम लावायला चालणारे हे लोक देशात शुद्र अतिशुद्राचे राजकारण करित आहेत. आपला आवाज बुलंद करण्यासाठी मुक्या असलेल्या संसदेसमोर काही बोलून होणार नाही, तर त्यासाठी रस्त्यावर उतरु न लढाई लढावी लागणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले.अन्यायाविरुद्ध बोलणे म्हणजे राष्ट्रविरोधी - शेहला रशीददेशात महिलांवर अत्याचार होत असताना भाजपाची ‘बलात्कारी बचाव’ मोहीम सुरू आहे. सामाजिक न्यायाची कुचंबणा होत असताना राष्ट्रवादी म्हणवणारे बोलत नाही. तर, जे लोक या अन्यायाविरोधात बोलतात त्यांना राष्ट्रविरोधी ठरविले जाते. काश्मिरात हिंदू एकतेचे नावाने भाजपची जी शाखा काम करीत आहे, तीचे काम बघून भाजपा नव्हे तर भारत जलाव पार्टी असल्याची घणाघाती टिका जवाहरलाल जेएनयुच्या विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांनी केली.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती