१ आॅक्टोबरपासून बंद : बसचाच उरणार आधार गोंदिया : जबलपूर-बालाघाट गेजवर परिवर्तनाचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या १ आॅक्टोबरपासून नागपूर-जबलपूर, बालाघाट-जबलपूर नॅरोगेज मार्गावर धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या बंद करण्यात येणार आहेत. जोपर्यंत ब्रॉडगेज सुरू होत नाही तोपर्यंत गाड्या बंद असल्यामुळे जबलपूर व बालाघाटकडे जाणाऱ्या प्रवाशांना राज्य परिवहन मार्गांचाच आश्रय घ्यावा लागेल.रेल्वे गाडी (५८८६३) बालाघाट-जबलपूर, (५८८६५) बालाघाट-जबलपूर, (५८८६७) बालाघाट-जबलपूर, (५८८६९) बालाघाट-जबलपूर, (५८८६४) जबलपूर-बालाघाट, (५८८६६) जबलपूर-बालाघाट, (५८८६८) जबलपूर-बालाघाट, (५८८७०) जबलपूर-बालाघाट, (५८८७३) बालाघाट-नैनपूर, (५८८७१) बालाघाट-जबलपूर, (५८८६४) जबलपूर-बालाघाट, (५८८६६) जबलपूर-बालाघाट, (५८८७६) जबलपूर-नैनपूर, (५८८६८) जबलपूर-बालाघाट, (५८८७०) जबलपूर-बालाघाट, (५८८७४)नैनपूर-बालाघाट, (५८८५८) मंडला फोर्ट-बालाघाट, (५८८६४) नैनपूर-बालाघाट, (५८८६४) जबलपूर-बालाघाट, (५८८६८) जबलपूर-बालाघाट, (५८८७०) जबलपूर-बालाघाट आदी गाड्या १ आॅक्टोबरपासून बंद करण्यात येणार आहेत.या सर्व रेल्वेगाड्या बंद होणार असल्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावरून बालाघाट, नैनपूर किंवा जबरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. सर्व प्रवाशांना रस्त्याच्या मार्गाने बस किंवा खासगी वाहनानेच प्रवास करावा लागणार आहे. त्यात आर्थिक भुर्दंड बसेल. (प्रतिनिधी)
जबलपूर-बालाघाट नॅरोगेजचे काऊंटडाऊन
By admin | Updated: September 25, 2015 02:20 IST