शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

शाळांमध्ये झाली कोरोनाची एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर शासनाने इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचे नियम पाळत शाळा सुरू होऊन आता पाच महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र मार्च महिन्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढीला सुरुवात झाली आहे. मागील तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच शाळांमध्ये देखील कोरोनाने एन्ट्री केल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्दे१२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण : शाळा बंद करण्यावर मंथन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यातच आता शाळांमध्ये सुध्दा कोरोनाची एन्ट्री झाली असून १२ शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पालकांमध्ये सुध्दा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग बघता १५ दिवसांसाठी इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याबाबत शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाने मंथन सुरु केले आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर शासनाने इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचे नियम पाळत शाळा सुरू होऊन आता पाच महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र मार्च महिन्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढीला सुरुवात झाली आहे. मागील तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच शाळांमध्ये देखील कोरोनाने एन्ट्री केल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १, देवरी १, गोंदिया ९ आणि तिरोडा तालुक्यातील १ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सध्या विद्यार्थी आणि शिक्षण विभागातर्फे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यात तपासणी दरम्यान विद्यार्थी कोरोना बाधित आढळले. त्यामुळे शाळांमध्ये सुद्धा खळबळ उडाली आहे. कोरोना बाधित विद्यार्थी आढळलेल्या शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.  

१५ दिवसांसाठी शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्यातच आता शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाल्याने प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या शाळा १५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात याव्या असा प्रस्ताव शिक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. यावर शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यातील १२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा अहवाल प्राप्त होताच शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. वाढता संसर्ग लक्षात घेता १५ दिवस शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. - राजकुमार हिवारे,  शिक्षणाधिकारी प्राथमिक 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा