लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा उशीरा सुरू होत असून आरटीईच्या प्रवेशाचा आता मुहूर्त निघाला आहे. यंदा प्रवेशासाठी एकच संधी देण्यात येणार होती. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे पालक इकडे-तिकडे अडकले असल्यामुळे त्यांना प्रवेशासाठी तीन संधी दिल्या जाणार आहे.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवून १७ मार्च २०२० रोजी लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीद्वारे एक लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे काम काम झाले नाही. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.सन २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले आहे. सद्यस्थितीत केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे केवळ या शैक्षणिक वर्षासाठी शाळास्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात येणार आहे. अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या आहेत.शाळेत आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगिन विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले आहेत.या नावापुढे या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलवायचे आहे ती तारीख शाळेने टाकावी. त्याप्रमाणे पालकांना एसएमएस जातील. गर्दी होणार नाही अशा प्रकारे शाळेचे नियोजन करावे व कोणत्या तारखेला बोलावे हे शाळेने ठरवावे अश्या सूचना दिल्या आहेत. प्रवेशाचे वेळापत्रक शाळेच्या गेटवर अथवा योग्य त्या ठिकाणी लावण्यात यावेत. शाळेत आल्यानंतर पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत प्राप्त करून घेणे कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी. पालकांनी आपल्याकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे. ती नोंद करून पालकांना परत करावे.गोंदिया जिल्ह्यातील ९०३ जागांसाठी ३ हजार ६५८ अर्ज आले आहेत.ऑनलाईन अभ्यासक्रमपालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे, काही पालक मूळगावी किंवा अन्य काही स्थलांतर झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते पालक आले नाही तर त्यांना पुन्हा संधी देण्यात यावी, तसा एसएमएस पाठवावा. त्यांना दिलेल्या तारखेला ते उपस्थित न राहिल्यास तिसऱ्यांदा तारीख देण्यात यावी अशा प्रकारे पालकांना तीन वेळा संधी द्यावी. शाळेने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर अशा तात्पुरत्या प्रवेशित बालकांना लाभ देण्यात यावा. शाळा जेव्हा प्रत्यक्षात सुरू होईल तेव्हा या बालकांना प्रवेश झाले असे समजून वर्गात बसण्याची मुभा द्यावी.
कोरोनामुळे आरटीई प्रवेशासाठी मिळणार तीन संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवून १७ मार्च २०२० रोजी लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीद्वारे एक लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे काम काम झाले नाही. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.
कोरोनामुळे आरटीई प्रवेशासाठी मिळणार तीन संधी
ठळक मुद्देशाळेतच मिळणार प्रवेश : आरटीई प्रवेशाचा निघाला मुहूर्त, विद्यार्थ्यांच्या पालकांची प्रतीक्षा संपली