शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने दिली मातीचे ॠण फेडण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

तालुक्यातील ग्राम हिरापुर येथील पाच, ग्राम सटवा येथील एक, ग्राम दवडीपार येथील पाच व ग्राम पुरगाव येथील सहा असे एकूण २२ माजी विद्यार्थी कुणी शिक्षणासाठी, कुणी मजुरीसाठी तर कुणी व्यवसायासाठी परराज्यातून आपापल्या घरी परतले आहेत. नियमानुसार त्या सर्वांना त्यांच्या गावातीलच जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देक्वारंटाईन युवकांकडून सफाई अभियान : माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : ज्या शाळेत आपण शिकलो मोठे झालो. ज्या शाळेच्या मातीत खेळलोे आणि आयुष्याची बेरीज वजाबाकी शिकलो. त्या शाळेचे आणि गावच्या मातीचे ॠण फेडण्याची हिच वेळ आहे. हे शब्द आहेत गावातील माजी विद्यार्थ्यांचे. हे २२ माजी विद्यार्थी कोरोनामुळे गावाकडे परतले असून सर्वांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. या काळात त्यांनी आपापल्या गावातील शाळांमध्ये सफाई करून शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे.तालुक्यातील ग्राम हिरापुर येथील पाच, ग्राम सटवा येथील एक, ग्राम दवडीपार येथील पाच व ग्राम पुरगाव येथील सहा असे एकूण २२ माजी विद्यार्थी कुणी शिक्षणासाठी, कुणी मजुरीसाठी तर कुणी व्यवसायासाठी परराज्यातून आपापल्या घरी परतले आहेत.नियमानुसार त्या सर्वांना त्यांच्या गावातीलच जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. १४ दिवस क्वारंटाईन ठेवण्याचे शासनाचे आदेश असल्याने या काळात शाळेसाठी काही तरी विशेष केले पाहिजे ही भावना या माजी विद्यार्थ्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच दरम्यान शाळा सफाई अभियानाला त्यांनी सुरूवात केली.वर्षभर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी शाळेची सफाई व झाडांचे संगोपण करतात. मात्र सुटीत शाळेची दुरवस्था होत असून झाडे मरून जातात. मात्र यंदा सुट्यांमध्येच कोरोनाने डोके वर काढले व नशिबाने क्वारंटाईन करण्यात आलेल्या या माजी विद्यार्थ्यांना शाळेसाठी काही तरी करण्याची संधी मिळाली. या माजी विद्यार्थ्यांनी शालेय परीसरातील स्वच्छता, झाडांना पाणी देणे, झाडांची कटिंग करणे, कचरा काढणे ही सर्व कामे हाती घेतली आणि शाळेचा चेहरामोहराच बदलवून टाकला आहे.झाडांना दररोज पाणी मिळत असल्याने झाडे ही डोलू लागली आहेत. त्यामुळे गावखेड्यातील जिल्हा परिषद शाळांचे रूपडे पालटल्याचे चित्र बघायला मिळत आहे.यावे ज्ञानासाठी... निघावे सेवेसाठीज्या शाळेत बालपण गेले. त्या मंतरलेल्या दिवसाची आठवण येते. शहराच्या झगमगाटीत गावातील वैभवाचा विसर पडला होता. कोरोना ने सर्व काही शिकविले. बालपणी ज्ञानासाठी आलो होतो आता नशिबाने शाळेच्या सेवेसाठी उपलब्ध आहो.-एक माजी विद्यार्थी, पुरगाव-------------------हिरापूर येथील ५ माजी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत स्वमर्जीने शालेय परीसरातील झाडांना पाणी देणे व स्वच्छता मोहीम राबविण्याचे काम हाती घेतले आहे .- भुपेश गौतमउपसरपंच, हिरापूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा