लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असताना गुरूवारी (दि.३०) आणखी १३ कोरोना बाधितांची भर पडली. एकाच दिवशी कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ झाल्याने जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. १३ कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ४२ वर पोहचली आहे. २६७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप गोंदिया प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.बुधवारी कोराना बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये देवरी येथील दोन, गोंदिया तालुक्यातील कटंगीकला, चांदणीटोला, गोंदिया शहरातील श्रीनगर व मरारटोली अशा एकूण चार रुग्णांचा समावेश आहे. मरारटोली येथे आढळलेला रुग्ण हा जालंधर येथून आलेला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील डवा येथील एक रुग्ण, तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा व बेलाटी येथील एक, सालेकसा तालुक्यातील सीतेपार येथील रुग्ण हा काश्मीर येथून आलेला आहे. आमगाव तालुक्यातील तिगाव व घाटटेमनी येथील प्रत्येकी एक यापैकी घाटटेमनीचा रुग्ण हा राजस्थान येथून आलेला आहे. तर एक रुग्ण हा मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर येथून जिल्ह्यात आलेला आहे. विशेष म्हणजे देवरी येथील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने देवरी कोरोनाचा हॉटस्पाट होत असल्याचे चित्र आहे. बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्यांमुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला असून याला प्रतिबंध लावण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ९०६५ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यामुळे ८४१६ नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. तर २६७ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. २६७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. तर ११५ स्वॅब नमुन्यांबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. बाधित असण्याची शक्यता असलेल्या रु ग्णांचा शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील १६३२ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यात १६२४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.जिल्ह्यात आता ३९ कंटेन्मेंट झोनजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने १७६ चमू आणि ६२ सुपरवायझरची ३९ कंटेन्मेंट झोनसाठी नियुक्ती केली आहे. कंटेन्मेंट झोनमधील मधुमेह, उच्च रक्तदाब, आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्यात ३९ क्रि याशील कंटेन्मेंट झोन आहे.यामध्ये गोंदिया तालुक्यात मुंडीपार,फत्तेपुर,डोंगरगाव, सेजगाव, पारडीबांध, गोंदिया येथील कुंभारेनगर व सिव्हिल लाईन, रेल्वे लाईन, कुडवा, सालेकसा तालुक्यातील पाथरी, पाउलदौना, शारदानगर, रामाटोला, देवरी तालुकयातील देवरी येथील वॉर्ड क्रमांक ५, ८, ९, १०, आणि १६, आखरीटोला, गरवारटोली,सडक अर्जुनी तालुक्यातील राका, सौंदड, खोडशिवनी व पाटेकुरा, गोरेगाव तालुक्यातील भडंगा, डवा व घोटी आणि तिरोडा तालुक्यातील तिरोडा येथील सुभाष वॉर्ड, वीर वामनराव चौक, भूतनाथ वॉर्ड, न्यू सुभाष वॉर्ड, किल्ला वॉर्ड, नेहरू वॉर्ड, गराडा, बेरडीपार, बेलाटी, खुर्द आणि अर्जुनी, मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी आदी गाव आणि वॉर्डचा या कंटेन्मेंट झोनमध्ये समावेश आहे.
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:00 IST
बुधवारी कोराना बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये देवरी येथील दोन, गोंदिया तालुक्यातील कटंगीकला, चांदणीटोला, गोंदिया शहरातील श्रीनगर व मरारटोली अशा एकूण चार रुग्णांचा समावेश आहे. मरारटोली येथे आढळलेला रुग्ण हा जालंधर येथून आलेला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील डवा येथील एक रुग्ण, तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा व बेलाटी येथील एक, सालेकसा तालुक्यातील सीतेपार येथील रुग्ण हा काश्मीर येथून आलेला आहे.
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक
ठळक मुद्दे१३ बाधितांची भर : २६७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अप्राप्त,२२८ जण कोरोना मुक्त