शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया मेडिकलमधील डॉक्टरच कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 18:35 IST

गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) एका डॉक्टरसह दोन जणांचे स्वॅब नमुने गुरूवारी (दि.९) कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आणखी तीन कोरोना बाधितांची भर पडली. तर संबंधित डॉक्टर हा रुग्ण आणि अनेक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला असल्याने मेडिकलमध्ये खळबळ उडाली

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांमध्ये खळबळचार कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) एका डॉक्टरसह दोन जणांचे स्वॅब नमुने गुरूवारी (दि.९) कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आणखी तीन कोरोना बाधितांची भर पडली. तर संबंधित डॉक्टर हा रुग्ण आणि अनेक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला असल्याने मेडिकलमध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान संपर्कात आलेल्यांना ट्रेस करुन जवळपास वीस जणांचे स्वॅब नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मेडिकलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर सध्या मेडिकल आणि गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. दरम्यान या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे गुरूवारी प्राप्त झालेल्या स्वॅब नमुन्याच्या अहवालावरुन स्पष्ट झाले.अहवाल प्राप्त होताच मेडिकलमधील डॉक्टर, कर्मचारी आणि इतर रुग्णांमध्ये खळबळ उडाली होती. हे डॉक्टर ज्या विभागात कार्यरत होते त्यांच्या संपकार्तील २० जणांना क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे मेडिकलच्या अधिकाºयांनी सांगितले. गुरूवारी आढळलेल्या एकूण तीन कोरोना बाधितांमध्ये एक मेडिकलचे डॉक्टर आणि दुसरे दोन रुग्ण हे आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील आहे. या दोन्ही रुग्णांना बाहेरील प्रवासाची हिस्ट्री आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली असतानाच जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले चार कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९५ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १३० कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या स्थितीत जिल्ह्यात एकूण ६३ कोरोना कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे.४८९१ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ५०८६ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. यापैकी १९५ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर ४८९१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर २२१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.कंटेन्मेंट झोनमध्ये सर्वेक्षण सुरूजिल्ह्यातील १७ कंटेन्मेंट झोनमधील मधूमेह, उच्च रक्तदाब तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यासाठी ९८ चमू व ३४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस