लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य साथरोग नियंत्रण व कोरोना प्रतिबंध अंतर्गत सार्वजनिक आरोग्य सेवा विभागातर्फे जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या नियंत्रणात शहरातील मरारटोली परिसरातील जिल्हा क्रीडा संकुलात १०० खाटांचे कोरोना केअर सेंटर नुकतेच सुरू करण्यात आले आहे. शहर तसेच लोकवस्तीपासून वेगळे असलेल्या या सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुलच्या अतिथीगृहात १०० खाटांची सोय करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोरोना प्रतिबंधक धोरणानुसार सार्वजनिक आरोग्य सेवेतर्फे ३-टायर म्हणजे त्रीस्तरीय पद्धतीने आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत असल्याची माहिती कोरोना केअर सेंटरच्या नोडल अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी दिली.तालुकास्तरावर अत्यंत सौम्य व साधारण संशयीत कोरोना रूग्णांना विलगीकरण व स्क्रीनिंग करण्यासाठी कोरोना केअर सेंटर तसेच त्यापेक्षा जास्त आरोग्य विषयक गुंतागुंत असेल तर जिल्हास्तरीय कोरोना सेंटर (डीएचसी ) तसेच त्यापेक्षा श्वसनदाह व इतर आजार जसे मधुमेह, उच्च रक्तदाब इतर आजार असेल तर आयसीयु युक्त (डीसीएचसी) डेडीकेटेड कोरोना केअर सेंटर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यान्वीत करण्यात आले आहे.शासनाच्या धोरणानुसार कोरोना आणि नॉन कोरोना रूग्णालय स्वतंत्रपणे व्यवस्थापन करून साथरोग कसे लवकर आटोक्यात आणण्यात येईल अशा पद्धतीने काम सुरू आहे. जिल्हा नोडल अधिकारी डॉ. मनोज राऊत यांच्या नियंत्रणात जिल्हा क्रीडा संकुलच्या कोरोना केअर सेंटरमध्ये एक एमबीबीएस डॉक्टर, दोन आयुष अधिकारी, तीन सीएचओ, पाच परिचारिका, तीन कक्षसेवक तसेच सफाई कामगारांची नियुक्ती बाई गंगाबाई महिला रूग्णालयाच्या आस्थापनेवरून करण्यात आली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून अतिरिक्त मनुष्य बळाची सोय केली आहे. अशा पद्धतीने कोरोना साथ प्रतिबंधक कृती आराखडानुसार जिल्ह्यात त्रिस्तरीय आरोग्य उपाययोजना जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोना केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहे. सध्या या कोरोना सेंटरमध्ये नागपूरहून गोंदियाला आलेले ३० एसआरपी जवान विलगीकरण व कोरोना स्क्रीनिंगसाठी भरती आहेत.
जिल्हा क्रीडा संकुलात कोरोना सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST
तालुकास्तरावर अत्यंत सौम्य व साधारण संशयीत कोरोना रूग्णांना विलगीकरण व स्क्रीनिंग करण्यासाठी कोरोना केअर सेंटर तसेच त्यापेक्षा जास्त आरोग्य विषयक गुंतागुंत असेल तर जिल्हास्तरीय कोरोना सेंटर (डीएचसी ) तसेच त्यापेक्षा श्वसनदाह व इतर आजार जसे मधुमेह, उच्च रक्तदाब इतर आजार असेल तर आयसीयु युक्त (डीसीएचसी) डेडीकेटेड कोरोना केअर सेंटर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यान्वीत करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा संकुलात कोरोना सेंटर
ठळक मुद्दे१०० खाटांची सोय : नागपूरहून आलेले ३० एसआरपी जवान विलगीकरणात