शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोना स्फोट; २५९ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 21:38 IST

गोंदिया : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. सोमवारी पुन्हा स्फोट झाला असून २५९ नवीन रूग्णांची भर पडली आहे.

ठळक मुद्दे६० रूग्णांनी केली मात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. शुक्रवारी (दि.११) २२९ रूग्ण आढळून आल्यानंतर सोमवारी (दि.१४) पुन्हा स्फोट झाला असून २५९ नवीन रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता कोरोना रूग्ण संख्या ३४१६ झाली आहे. सोमवारी ६० रूग्ण कोरोनावर मात करून घरी गेले असून आतापर्यंत १७७८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे १५८८ क्रियाशील रूग्ण जिल्ह्यात आहेत. तर सोमवारी २ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी जिल्ह्यात आढळून आलेल्या २५९ कोरोना बाधित रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील सर्वाधिक १९४ रुग्ण आहेत. जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यात १९९८, तिरोडा तालुक्यात ४८८, गोरेगाव तालुक्यात १२५, आमगाव तालुक्यात २३८, सालेकसा तालुक्यात १००, देवरी तालुक्यात १४६, सडक-अर्जुनी तालुक्यात १०७, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १४६ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले ६९ रुग्ण असून एकूण ३४१७ रुग्ण बाधित आढळले आहे.

तर ज्या ६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४५, तिरोडा तालुक्यातील २, आमगाव तालुक्यातील ६, देवरी तालुक्यातील ३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ व सडक-अर्जुनी येथील २ रुग्णांचा समावेश आहे. जिल्हयात आतापर्यंत १७७८ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ९७७, तिरोडा तालुक्यातील ३११, गोरेगाव तालुक्यातील ५२, आमगाव तालुक्यातील १३१, सालेकसा तालुक्यातील ५७, देवरी तालुक्यातील ६५, सडक-अर्जुनी तालुक्यातील ७३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १०५ आणि इतर ७ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या आता १५८८ झाली आहे. त्यापैकी १५७५ क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात व १३ रुग्ण नागपूर येथे उपचार घेत आहेत.४०१ रूग्ण घरीच अलगीकरणातकोरोना क्रियाशील रुग्णांपैकी ४०१ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यात ३६८, तिरोडा तालुक्यात १०, गोरेगाव तालुक्यात ००, आमगाव तालुक्यात ६, सालेकसा तालुक्यात ३, देवरी तालुक्यात १, सडक-अर्जुनी तालुक्यात ३, अर्जुनी- मोरगाव तालुक्यात १० व इतर ०० असे एकूण ४०१ क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.जिल्ह्यात ५१ रूग्णांचा मृत्यूजिल्हयात आतापर्यंत ५१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुक्यात २६, तिरोडा तालुक्यात १०, गोरेगाव तालुक्यात १, आमगाव तालुक्यात ५, सालेकसा तालुक्यात १, सडक -अर्जुनी तालुक्यात ३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १ व इतर ठिकाणच्या ४ रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस