शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात कोराना ब्लास्ट : रेकॉर्ड ब्रेक २२९ नवे कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 21:07 IST

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट होऊन रेकॉर्ड ब्रेक २२९ रुग्ण आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्दे९३ रुग्णांची कोरोनावर मातबाधितांची संख्या पोहोचली २९०८ वर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया, : कोरोना संसर्गाचा आलेख जिल्ह्यात वेगाने वाढतांना दिसत आहे. आज तर कोरोनाचा ब्लास्ट होऊन रेकॉर्ड ब्रेक २२९ रुग्ण आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ४ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर ९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ४ रुग्ण हे बाहेर जिल्हा किंवा राज्यातील आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे ३४ वर्षीय रुग्ण राहणार आमगाव यांना लिव्हर व पॅनक्रीयाटायटीसचा त्रास होता, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ४५ वर्षीय रुग्ण राहणार पुनाटोली (गोंदिया) यांचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे मृत्यू झाला, ४६ वर्षीय रुग्ण राहणार तिरोडा यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे मृत्यू झाला. तर ५९ वर्षीय रुग्ण राहणार तुमसर (भंडारा) यांना मधुमेहाचा त्रास होता, त्यांचा गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.जिल्हयात कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची शक्यता आहे किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी विषाणू प्रयोगशाळेतून किंवा रॅपिड अँटिजेन चाचणीतून करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत प्रयोगशाळा चाचणीतून २०३५ नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून १०३३ नमुने असे एकूण ३०६८ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १६३ रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-१६५३, तिरोडा तालुका-४३१, गोरेगाव तालुका-१११, आमगाव तालुका-२१२, सालेकसा तालुका-८७, देवरी तालुका-१२६, सडक/अजुर्नी तालुका-९३, अजुर्नी/मोरगाव तालुका-१३७ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-५८ रुग्ण आहे. असे एकूण २९०८ रुग्ण बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यातील ९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस