शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पुरातन वृक्षाच्या संरक्षणात शेतकºयांचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 21:17 IST

आज पर्यावरणाचा असमतोल निर्माण झाला आहे. त्याचे परिणाम जीवनसृष्टीवर होत आहे. बदलत्या वातावरणामुळे वृक्षांचे संवर्धन आणि संरक्षण करणे काळाची गरज आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : वृक्ष संरक्षण योजनेअंतर्गत धनादेश वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आज पर्यावरणाचा असमतोल निर्माण झाला आहे. त्याचे परिणाम जीवनसृष्टीवर होत आहे. बदलत्या वातावरणामुळे वृक्षांचे संवर्धन आणि संरक्षण करणे काळाची गरज आहे. हजारो वर्षांपासून असलेली जंगले वाचविण्यात सर्वसामान्य शेतकºयांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.नवेगावबांध येथील वन आगार सभागृहात शुक्रवारी (दि.३) वन विभागाच्यावतीने आयोजीत वृक्ष संरक्षण योजना सन २०१७-१८ अंतर्गत १०० वर्षे जुन्या वृक्षांचे संरक्षण केल्याबद्दल शेतकºयांना धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, उपवनसंरक्षक एस.युवराज, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य मंदा कुमरे, होमराज कोरेटी, रामलाल मुंगनकर, प्रेमलाल गेडाम, अर्चना राऊत, तहसीलदार देवदास बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, तालुका कृषी अधिकारी तुमडाम, नवेगावबांधचे सरपंच अनिरुध्द शहारे, रघुनाथ लांजेवार, डॉ.डोंगरवार उपस्थित होते.पुढे बोलताना बडोले यांनी, पूर्व विदर्भाच्या एकूण भागापैकी ३५ टक्के भाग हा जंगलव्याप्त आहे. त्या तुलनेत उर्वरित महाराष्ट्रात जंगलाचे प्रमाण कमी आहे. अनेक वर्षांपासून आपल्याकडून वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात येत आहे. ज्या शेतकºयांच्या शेतात १०० सेमी. गोलाईचे वृक्ष आहे त्यांना सुध्दा या योजनेअंतर्गत मदत मिळाली पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी वृक्ष संवर्धनाच्या कामात पुढाकार घेतील. आज निसर्ग वाचिवण्यात सर्वांच्याच सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.वनावरील ग्रामीणांच्या सरपणासाठी असलेले अवलंबीत्व कमी व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात गॅस वाटप करण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी, ग्रामीण भागात अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांकडे पाहिजे त्या प्रमाणात गॅस कनेक्शन नाही. त्यामुळे या वर्गातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त कुटूंब सरपणासाठी जंगलावर अवलंबून असतात. यांच्यासाठी वनविभागाने नियोजन करून गॅस कनेक्शन देण्याची कार्यवाही करावी असेही ते म्हणाले. तसेच नवेगावबांध उद्यान परिसरात पर्यटकांच्या निवासाच्या दृष्टीने रिसॉर्टचे बांधकाम सुरु असून तलाव परिसरात बीच, उद्यानाचे सौंदर्यीकरण, झीप लाईनची कामे पर्यटनाच्या दृष्टीने करण्यात येतील. नवेगावबांधला गतवैभव प्राप्त करु न देण्यासाठी व जास्तीत जास्त पर्यटक येथे येतील या दृष्टीकोनातून विकास कामे करण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी काळे यांनी, जिल्ह्यात चांगली वनराई आहे. आज मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. पर्यावरणाच्या असंतुलनामुळे पाऊस सुध्दा कमी येत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. जुन्या वृक्ष संरक्षणासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करणारी राज्यातील गोंदिया नियोजन समिती ही एकमेव असल्याचे सांगीतले. तसेच ज्या शेतकºयांकडे १०० वर्षापेक्षा जूने वृक्ष आहेत त्या वृक्षांचे संरक्षण प्रत्येक शेतकºयाने करावे. अशा वृक्षांची नोंद तलाठ्यामार्फत सातबारात करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.प्रास्ताविक उपवनसंरक्षक एस.युवराज यांनी मांडले. संचालन करून आभार नवेगावबांधचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एम.खान यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.१५१ शेतकºयांना धनादेश वाटपयावेळी नवेगावबांध, गोठणगाव व अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रातील १५१ शेतकºयांना १०० वर्षांपासूनची त्यांच्या शेतातील १५० सेमी. गोलाईच्यावरील झाडांचे संरक्षण केल्याबद्दल प्रती वृक्ष एक हजार रु पये याप्रमाणे धनादेश वाटप करण्यात आले. यात मंसाराम मडावी, सीताराम कुंभरे, मोहन कुंभरे, सीताराम मडावी, मधुकर करचाल, संध्या कराडे, केवळराम कोरामी, दिनानाथ बाळबुध्दे, मनोहर पुस्तोडे, शांतीप्रकाश बोरकर, मुरारी नेवारे, दिनेश फुल्लूके यांचा समावेश आहे.