शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
3
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
4
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
5
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
6
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
7
वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
8
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
9
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
10
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
11
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
12
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
13
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
14
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
15
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
16
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
17
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
18
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
20
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
Daily Top 2Weekly Top 5

चर्चासत्रात वैचारिक देवाणघेवाण

By admin | Updated: December 20, 2014 22:42 IST

येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात इलेक्टॉनिक्स, गणित आणि रसायसनशास्त्र विभागाच्यावतीने इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे नोव्हेल सिंथेसीस आॅफ एडवांस मटेरियल, गणित विभागाचे इमर्जींग

गोंदिया : येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात इलेक्टॉनिक्स, गणित आणि रसायसनशास्त्र विभागाच्यावतीने इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे नोव्हेल सिंथेसीस आॅफ एडवांस मटेरियल, गणित विभागाचे इमर्जींग ट्रेंड अन क्रिप्टोलॉजी, कोडींग थिअरी अँड अलाईड टॉपिक्स तर रसायनशास्त्र विभागाचे मायक्रो स्केल टेकनिक्स इन केमीस्ट्री यावर विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन शनिवारी (दि.२०) सकाळी १० वाजता करण्यात आले होते. राष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी गोंदिया शिक्षण संस्थाचे सचिव आमदार राजेंद्र जैन होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पूर्व विभागाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस.व्ही. मोहरील, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू, रेल विकास प्राधिकरण बँगलोरचे मुख्य कार्यपालन अधिकारी एस.एस.गगरीन, श्री सत्य साई विद्यापीठाचे डॉ. नवीन चंद्रा, डॉ. जे.जी.महाखोडे, डॉ. एस.आर.त्रिवेदी, डॉ. हातझाडे उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून या चर्चासत्राची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी आमदार जैन यांनी, या राष्ट्रीय चर्चासत्रातून नावीन्यपूर्ण नअशा विविध विषयांना उजाळा मिळणार असून उपस्थितांना या संधीचे सोने करून घेण्याचे आवाहन केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांनी, राष्ट्रीय चर्चासत्रा निमित्ताने महाविद्यालयात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. तर डॉ. त्रिवेदी यांनी आभार मारून उद्घाटन सभारंभाची सांगता केली. त्यानंतर घेण्यात आलेल्या विविध तांत्रीक सत्रात देशाच्या विविध भागातून आलेल्या पाहुण्यांनी उपस्थितांना संबोधीत केले. यात इलेक्ट्रीनिक्स विभागात घेण्यात आलेल्या तीन तांत्रीक सत्रात पाहुण्यांनी आपापल्या विषयाला अनुसरून उपस्थितांना मार्गदर्शन केले. याशिवाय गणित विभागाचे तांत्रीक सत्रही तीन सत्रात घेण्यात आले. याप्रसंगी संयोजन सचिव डॉ. त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेत कोडींग थिअरी, क्रिप्टोग्राफी व एलाईड टॉपीक्सवर चर्चा करण्यात आली. या चर्चासत्राचे संचालन महाविद्यालयातील प्रा. धारणा टेंभरे व प्रा. गोविंद राठोड यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी काजल राघानी व आयूष अग्रवाल यांनी केले. आभार प्रा. डॉ. त्रिवेदी यांनी मानले. या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. नायडू यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील अन्य प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)