शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांनो सावधान ! इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे तपासूनच करा खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:32 IST

ग्राहकांची फसवणूक : तपासणीकडे वैधमापनशास्त्र विभागाचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : किराणा दुकान असो वा सोन्या-चांदीचे, इलेक्ट्रॉनिक काट्यामुळे फसवणूक होत नाही या भ्रमात तुम्ही असाल तर ते चुकीचे आहे. कारण अनेक दुकानदार इलेक्ट्रॉनिक वजन काट्याच्या मापात फेरफार करतात. इलेक्ट्रॉनिक काट्यांपैकी ५० टक्के काट्यांमध्ये दोष असून, त्याकडे वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी कानाडोळा करीत असल्याचा ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. साप्ताहिक बाजारात एक किलो भाजी घेतल्यास पाऊण किलोच मिळत असल्याचा अनुभव गृहिणींना येतो. वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी तपासणीदरम्यान अर्थपूर्ण कारवाई करून विक्रेत्यांना सोडून देतात. 

तक्रारीनंतरही अधिकारी कारवाई करीत नाहीत. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक लूट होते. साप्ताहिक बाजारात खरेदी करणारे ग्राहकही वजनाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे विक्रेत्यांचे फावते. अधिकाऱ्यांनी कमी वजन देणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कठोर कारवाई करावी, अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतकडून केली जाते. 

रिमोटद्वारे वजनात हेरफेरसध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक कबाडी इलेक्ट्रॉनिक्स काटा घेऊन वस्त्यांमध्ये फिरून लोकांकडून भंगार खरेदी करत असल्याचे दिसत आहे. तो वजनात हेरफेर करीत असल्याचे स्थानिक लोकांच्या लक्षात येताच त्यांनी एका माणसाचे वजन व लोखंडी गेटचे वजन केले. कबाडी रिमोटद्वारे मूळ वजन कसे कमी करतो, याचे प्रात्यक्षिक व्हिडीओत दिसून येत आहे. तुमच्या दारात भंगार वा पेपर रद्दी विकत घेण्यासाठी आलेल्या कबाडीपासून सावधान राहण्याची गरज आहे. तुम्हाला बोलण्यात गुंतवून विकलेल्या वस्तूंचे वजन कबाडी अर्ध्यावर आणतो आणि वजनाचे पैसे देऊन लगेच निघून जातो. हा व्यवहार वैधमापनशास्त्र विभागांतर्गत येतो.

ग्राहकांची होतेय लूट

  • बाजारात दूध, सीलबंद पाणी, बिस्किटे, शीतपेये छापील किमतीत विकण्याची सक्ती आहे. उन्हाळ्यात दुकानदार शीतपेय व पाणी थंड करण्याच्या नावाखाली अधिक शुल्क आकारतो. गॅस सिलिंडर घरी आणला जातो तेव्हा संबंधित गॅस एजन्सीला कंपनीने दिलेल्या वजन काट्यावर वजन करून दाखवण्याची सक्ती आहे. पण कधीही वजन होत नाही.
  • नामांकित कंपन्यांची अनेक २ प्रकारची खाद्यपदार्थांची पाकिटे दुकानांवर मिळतात; परंतु या पाकिटांवर दिलेले वजन आणि पाकिटात असलेल्या खाद्यपदार्थाच्या वजनात तूट असल्याचा प्रकार अनेकदा दिसून येतो. आठवडी बाजारातही एक किलो भाजी पाऊण किलो मिळाल्याच्या तक्रारी असतात.
टॅग्स :gondiya-acगोंदिया