शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

८५ टक्के इमारतींचे बांधकाम अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:43 IST

शहरात रस्त्यालगत होत असलेल्या इमारतींच्या बांधकामामुळे रस्ते अरुंद होत आहे.

ठळक मुद्देअतिक्रमणाने समस्येत वाढ : नगररचना विभागावर प्रश्न चिन्ह, नगर परिषद करणार सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात रस्त्यालगत होत असलेल्या इमारतींच्या बांधकामामुळे रस्ते अरुंद होत आहे. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची ओरड कायम असतानाच शहरातील ८५ टक्के इमारतींचे बांधकाम अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येमुळे शहरवासीय त्रस्त आहेत. त्यासंदर्भातील तक्रारींमध्ये वाढ होत आहे. शहरात खासगी व अथवा व्यावसायीक इमारतींचे बांधकाम करण्यासाठी नगर परिषद नगररचना विभागाची परवानगी आवश्यक आहे. इमारतीचे बांधकाम करण्यापूर्वी नगररचना विभागाची परवानगी आवश्यक आहे. त्या शिवाय बांधकाम करता येत नाही. बांधकामाच्या नकाशाला मंजूरी दिल्यानंतर त्यानुसार बांधकाम करण्यात आले अथवा नाही, याची पडताळणी करण्याची जबाबदारी देखील याच विभागाची आहे. मात्र नगररचना विभाग केवळ इमारत बांधकामाच्या नकाशांना मंजूरी देऊन मोकळा होत असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बांधकाम होत असल्याचे चित्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १ लाख ३२ हजार होती. त्यामध्ये गेल्या सहा ते सात वर्षांत आणखी भर पडली आहे. नगररचना विभागाच्या अहवालानुसार शहरात सध्यास्थितीत ७० हजारावर इमारती आहेत. यापैकी ८५ टक्के इमारतींचे बांधकाम मंजूर नकाशानुसार करण्यात आलेले नाही. याची कबुली स्वत: नगर परिषदेच्या एका जबाबदार अधिकाºयांने दिली आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. शहरातील अनाधिकृत इमारतींच्या बांधकामाला टाच लावण्यासाठी शहरातील सर्व इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. लवकरच सर्वेक्षणाला सुरूवात केली जाणार आहे. त्यानंतर नकाशानुसार नसलेले अतिरिक्त बांधकाम पाडण्यात येणार असल्याची माहिती आहे.मालमत्ता कर वसुलीवर परिणामशहरात इमारतींचे बांधकाम करताना नगररचना विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र काहीजण परवानगी घेत नाहीत. तर काहीजण मंजुरी घेतलेल्या नकाशापेक्षा अधिक बांधकाम करतात. परिणामी मालमत्ता कर आकारणीवर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे वर्षाकाठी लाखो रुपयांचा कर बुडत असल्याचे चित्र आहे.अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडीवाढत्या अतिक्रमणामुळे शहरातील रस्ते अरुंद होत आहे. परिणामी मुख्य चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होते. वाहनचालक आणि पायी जाणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.तक्रारींमध्ये वाढअनाधिकृत बांधकामामुळे शेजाºया शेजाºयांमध्ये वाद होत आहे. यासंबंधीच्या तक्रारींमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याला केवळ नगररचना विभाग जबाबदार असल्याचा आरोप शहरवासीयांचा आहे.नगररचना आणि मालमत्ताकर आकारणी विभागाच्या मदतीने शहरात लवकरच इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येईल. मंजूर नकाशानुसार बांधकाम नसलेल्या इमारतींवर कारवाई केली जाईल.- चंदन पाटील,मुख्याधिकारी नगर परिषद.