शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

शुक्रवारी दुपारी १२ वाजता फुलचूर चौकातून काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा काँग्रेस कमिटीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पार्श्वभूमीवर किसान व मजूर बचाव दिवस पाळत या मोर्चाचे आयोजन केले होते. शेतकरी बचाओ, कृषी विधेयक रद्द, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविणारे फलक घेवून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देडफली वाजवून केला केंद्र सरकारचा निषेध : कृषी विधेयक रद्द करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने नुकतेच तीन कृषी विषयक विधेयक पारित केले आहे. हे विधेयक शेतकरी आणि शेतमजूर विरोधी असून ते रद्द करण्यात यावे या मागणीला घेवून जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी (दि.२) येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या धोरणाचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी डफली वाजवून नोंदविला.शुक्रवारी दुपारी १२ वाजता फुलचूर चौकातून काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा काँग्रेस कमिटीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पार्श्वभूमीवर किसान व मजूर बचाव दिवस पाळत या मोर्चाचे आयोजन केले होते. शेतकरी बचाओ, कृषी विधेयक रद्द, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविणारे फलक घेवून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला. त्यानंतर फुलचूर चौकातून बैलबंडी मोर्चाला सुरूवात झाली. त्यानंतर हा मोर्चा जयस्तंभ चौकातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पोहचला. या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा डफली वाजवून निषेध नोंदविला. या मोर्चाचे नेतृत्त्व काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव अमर वराडे, विनोद जैन, जितेश राणे यांनी केले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन राष्टपतींच्या नावे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी महिला काँग्रेस, किसान काँग्रेस, सेवा दल, ओबीसी विभाग, अनु.जाती विभाग, असंघटित मजदूर काँग्रेस, युथ काँग्रेस, एनएसयुआयचे कार्यकर्ते व नीलम हलमारे, सुर्यप्रकाश भगत, डॉ.संजीव ठकरेले, सुशील खरकाटे, प्रशांत लिल्हारे, नटवरलाल गांधी, विजेंद्र बरोडे, अमित भालेराव, जीवन शरणागत, चंद्रशेखर बगडे, प्रभा उपराडे, वंदना काळे,अजय रहांगडाले,अमर राहुल, ममता पाऊलझगडे, आलोक मोहंती यांनी सहकार्य केले.या आहेत प्रमुख मागण्याकेंद्र सरकारने पारित केलेले तिन्ही कृषी विधेयक रद्द करा.शेतकरी व शेतकरी विरोधी विधेयके श्रमिक विरोधी विधेयक रद्द करा.एअर इंडिया, एल.आय.सी, बँकासह सार्वजनिक उपक्रम विकण्यास विरोध.हाथरस येथील पीडितेला न्याय देण्यात यावा.शेतकरी आणि सर्वसामान्य विरोधी धोरणे केंद्र सरकारने मागे घ्यावीत.

टॅग्स :congressकाँग्रेसMorchaमोर्चा