ंलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील नागरिक किंवा शेतकरी यांचा कोणताही प्रश्न किंवा लढा असो कॉंंग्रेस नेहमीच त्यांच्या सोबत राहिली आहे. यामुळेच जनता विश्वास ठेवत असून अशीच साथ मिळाल्यास कॉंग्रेस पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार रामरतन राऊत, कॉंग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, जिल्ह्यात आम्ही आरोग्य, रोजगारान्मुख शिक्षण, सिंचन, पूरग्रस्त व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, वादळीवाºयातील नुकसानग्रस्तांची भरपाई यासह अन्य कित्येक कामे केली आहेत. लोकहितांची ही कामे घेऊन आम्हाला जनतेत जावे लागणार व घराघरापर्यंत पोहचावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.जिल्हा परिषद अध्यक्ष मेंढे यांनी, आमदार अग्रवाल यांच्यासारखे नेतृत्व मिळाल्यामुळे तालुका कार्यकर्ते नशीबवान असल्याचे म्हणत, आमदार अग्रवाल यांची आवाज अधीक बुलंद करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.प्रास्तावीक तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर यांनी मांडले. संमेलनाला सहसराम कोरोटे, नामदेव किरसान, अमर वराडे, विनोद जैन, प्रफुल अग्रवाल, राकेश ठाकूर, विमल नागपूरे, पी.जी.कटरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सिमा मडावी, शेखर पटेल, उषा शहारे, गिरीष पालीवाल, विजय टेकाम, दीपक पवार, लता दोनोडे, माधुरी कुंभरे, ज्योती वालदे, सरिता कापगते, माधुरी हरिणखेडे, हिरालाल फाफनवाडे, हेमलता डोये, धनलाल ठाकरे, स्नेहा गौतम, ओमप्रकाश भक्तवर्ती, चमन बिसेन, मनिष मेश्राम, प्रमिला करचाल, निता पटले, विनीता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनील मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कॉंग्रेस नेहमीच जनतेसोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:10 IST
जिल्ह्यातील नागरिक किंवा शेतकरी यांचा कोणताही प्रश्न किंवा लढा असो कॉंंग्रेस नेहमीच त्यांच्या सोबत राहिली आहे. यामुळेच जनता विश्वास ठेवत असून अशीच साथ मिळाल्यास कॉंग्रेस पक्ष ...
कॉंग्रेस नेहमीच जनतेसोबत
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुका कॉंग्रेस कार्यकर्ता मेळावा