शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महागाई व बेरोजगारीला घेऊन काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 05:00 IST

आज देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांच्या विचारांची आणि दूरदृष्टीपणाची गरज आहे. राहुल गांधी यांच्याशिवाय आता देशाला पर्याय नाही हाच आपला संकल्प घेऊन काँग्रेस कमिटीने त्यांचा वाढदिवस हा संकल्प दिन म्हणून साजरा करीत हे आंदोलन केले. याप्रसंगी शेतकरी समस्या, वाढती महागाई व बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व तीन काळे कृषी कायदे रद्द करा या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. 

ठळक मुद्देसंकल्प दिन केला साजरा : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने राहुल गांधी गांधी जन्मदिवस संकल्प दिन म्हणून साजरा करीत या दिनाचे निमित्त साधून शेतकरी समस्या, वाढती महागाई व बेरोजगारी विरोधात शनिवारी (दि.१९) जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानाना पाठविण्यात आले. मागील दीड वर्षापासून देश कोरोना महामारीचा सामना करीत आहे. या काळात शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने लाखो लोक बेरोजगार झाले. दिशाहीन नेतृत्वामुळे देश एका अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे मोठी हानी होऊ शकते, असा इशारा देत वेळीच उपाययोजना करण्याच्या सूचना राहुल गांधींनी पंतप्रधानांना केल्यानंतरसुध्दा हा जबाबदारीचा सल्ला न ऐकता देशाला हेकेखोरपणाने मरणाच्या खायीत लोटण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केल्याचा आरोप आंदोलनातून कॉंग्रेसने केला. अशात आज देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांच्या विचारांची आणि दूरदृष्टीपणाची गरज आहे. राहुल गांधी यांच्याशिवाय आता देशाला पर्याय नाही हाच आपला संकल्प घेऊन काँग्रेस कमिटीने त्यांचा वाढदिवस हा संकल्प दिन म्हणून साजरा करीत हे आंदोलन केले. याप्रसंगी शेतकरी समस्या, वाढती महागाई व बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व तीन काळे कृषी कायदे रद्द करा या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाध्यक्ष डॉ.एन.डी. किरसान यांच्या नेतृत्वात आयोजित या आंदोलनात प्रदेश सचिव विनोद जैन, अमर वराडे, महिला काँग्रेस अध्यक्ष उषा सहारे, युवक काँग्रेस अध्यक्ष अलोक मोहंती, किसान काँग्रेस अध्यक्ष जितेश राणे, सेवादल अध्यक्ष पन्नालाल शहारे, ओबीसी सेल अध्यक्ष जितेंद्र कटरे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष परवेज बेग, शहर अध्यक्ष जहीर अहमद, तालुकाध्यक्ष सूर्यप्रकाश भगत, रमेश अंबुले, रमेश लिल्हारे, गोपाल कापसे, नीलम हलमारे, शैलेश जायस्वाल, पवन नागदेवे, हंसराज गयगये, अजय रहांगडाले, राजीव ठकरेले, कीर्तीकुमार येरणे, मजहर खान, वंदना काळे, वनिता चिचाम, अनिता मुनेश्वर, भुमेश्वरी रहांगडाले, ममता पाऊलझगडे, लता इळपाचे, सरिता अंबुले, पुष्पा खोटेले, गंगाराम बावनकर, दलेश नागदवने, रवी क्षीरसागर यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सेल्फी विथ सिलिंडर व बेरोजगारांची मुलाखत या आंदोलनांतर्गत आंदोलकांनी वाढत्या खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल किमतीबाबत रोष व्यक्त करीत जसानी गॅस एजन्सीसमोर स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर दरवाढीबद्दल सिलिंडरच्या छायाचित्रासोबत महिलांनी सेल्फी काढून घोषणाबाजी करीत भाववाढीचा निषेध केला. तर युवक काँग्रेसने उपविभागीय कार्यालयासमोर बेरोजगारी आंदोलन केले. तेथे ‘मेक इन इंडिया प्रस्तुत मोदी बेरोजगार मेळावा भरविण्यात आला व  ‘इंटरव्ह्यू फॉर बेरोजगार’ असा बॅनर लावून बेरोजगार युवकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीcongressकाँग्रेस