शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

नियोजनाअभावी लसीकरण केंद्रावर गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 05:00 IST

स्थानिक प्रशासनाने शहरातील १० लसीकरण केंद्रांवर शनिवारी विशेष लसीकरण मोहीम घेतली. यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या केंद्रावर लसीकरण केले जाईल असे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी शहरातील १० केंद्रांवर सकाळी ८ वाजेपासूनच गर्दी केली होती. शहरातील गोंविदपूर येथे नगर परिषद शाळेत लसीकरण केंद्र देण्यात आले होते.

ठळक मुद्देऑपरेटर वेळेत न पोहोचल्याने नागरिकांमध्ये संताप : लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच रांगा

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने गोंदिया येथे शनिवारी (दि.१५) १० केंद्रांवर विशेष लसीकरण अभियान आयोजित केले होते. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती; पण सकाळी ९.३० वाजेपर्यंत गोंविदपूर येथील केंद्रावर कर्मचारी न पोहोचल्याने नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. स्थानिक प्रशासनाने शहरातील १० लसीकरण केंद्रांवर शनिवारी विशेष लसीकरण मोहीम घेतली. यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या केंद्रावर लसीकरण केले जाईल असे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी शहरातील १० केंद्रांवर सकाळी ८ वाजेपासूनच गर्दी केली होती. शहरातील गोंविदपूर येथे नगर परिषद शाळेत लसीकरण केंद्र देण्यात आले होते. त्यामुळे या केंद्रावर नागरिकांनी लस घेण्यासाठी सकाळी ८ वाजेपासूनच रांग लावली; पण केंद्रावर सकाळी ९.३० वाजेपर्यंत ऑपरेटरच न आल्याने नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला. नागरिकांचा गोंधळ वाढल्यानंतर केंद्रावरील काही कर्मचाऱ्यांनी ऑपरेटरला बोलाविले. ऑपरेटर आला, मात्र लाॅगिंग आयडी आणि पासवर्ड न मिळाल्याने लसीकरणाला सुरुवात झाली नव्हती. याच सर्व गोंधळात १० वाजल्याने सकाळपासून रांगेत असलेल्या नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला. यामुळे या केंद्रावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, १०.१५ वाजेच्या सुमारास लॉगिंग झाल्याने लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. मात्र, या सर्व प्रकारामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.  

नियोजनचा अभावस्थानिक प्रशासनाने शनिवारी गोंदिया शहरातील नगर परिषद शाळा गणेशनगर, नगर परिषद शाळा गोविंदपूर, नगर परिषद हायस्कूल रामनगर, नगर परिषद गर्ल्स हायस्कूल अग्रसेन भवनजवळ, जे. एम. पटेल शाळा अवंती चौक, मालवीय स्कूल श्रीनगर, मनोहर म्युनिसिपल हायस्कूल स्टेडियमजवळ, नगर परिषद शाळा माताटोली, नगर परिषद शाळा रेलटोली गुजराती शाळेजवळ, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभारेनगर या केंद्रांवर लसीकरणाची सोय केली होती. यासाठी सकाळी ९ वाजेची वेळ देण्यात आली; पण ऑपरेटरच ९.३० वाजेपर्यंत केंद्रावर पोहोचला नव्हता, तर लसीकरणाच्या संकेत स्थळाचे लाॅगिंग आयडी आणि पासवर्डचा घोळ कायम होता. एकंदरीत नियोजनाचा पूृर्णपणे अभाव होता.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या