शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST

तिरोडा : तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहात हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक ...

तिरोडा : तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहात हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप करण्यात आला.

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै कृषी दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावर्षी कृषी संजीवनी मोहीम २१ जून ते १ जुलै २०२१ या कालावधीत तालुक्यातील गावा-गावांत शेतीशी निगडित विविध विषयांवर कृषी विभाग व आत्माअंतर्गत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात आले. तसेच कृषी संजीवनी मोहिमेत तालुक्यात विविध गावांमध्ये कृषी विभागाच्या योजनांविषयी तसेच भात पीक, नर्सरीपासून, तर काढणी पश्‍चात तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रसार व प्रसिद्धीचे कार्यक्रम घेण्यात आले. १ जुलैरोजी पंचायत समिती सभागृह, तिरोडा येथे कृषी संजीवनी मोहीम समारोपीय कार्यक्रम साजरा करण्यात आला. उद्घाटन आमदार विजय रहांगडाले यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी अजय नष्टे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी के. एन. मोहाडीकर, तिरोडा पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. एम. गंगापारी, विस्तार अधिकारी अनुप भावे, कृषी अधिकारी वाय. बी. बावनकार, मंडळ कृषी अधिकारी पी. पी. खंडाईत, विस्तार अधिकारी भायदे, कुर्वे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाचे (आत्मा) उमेश सोनेवाने, अरविंद उपवंशी, शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष भाऊराव कठाणे, धनेंद्र अटरे, सोनेवाने उपस्थित होते. प्रास्ताविकातून मोहाडीकर यांनी, कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत केलेल्या प्रचार प्रसिद्धीबाबत पावर पॉईंट प्रेजेंनटेशन मान्यवर व शेतकऱ्यांना दाखविले. आमदार रहांगडाले यांनी, शेतकऱ्यांनी फक्त भात शेती करून चालणार नाही, तर आपल्या शेतीला औद्योगिक शेती कशी करता येईल, शेतीशी निगडित व्यवसाय कसे करता येईल, याकडे लक्ष द्यावे. तसेच भात पिकासोबत इतर पिके घ्यावी, असे सांगितले. विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर अजून जोमाने कार्य करावे, असेही यावेळी सूचित केले. नष्टे यांनी, शेतकऱ्यांना भात पिकासोबत फळ व भाजीपाला पिकांचा समावेश करून आर्थिक स्थिती कशी उंचावता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.

---------------------------------------------

कृषी कर्मचारी व शेतकऱ्यांचा सत्कार

कार्यक्रमात २०२०-२१ रब्बी हंगाम पीक स्पर्धेत तालुक्यातील सर्वात जास्त उत्पादन घेणारे शेतकरी लक्ष्मी टिकेश्वर बांते (सेलोटपार), कुसूम शिवाजी बांते (सेलोटपार), विश्वनाथ कांशिराम बांते (खैरी) यांचा तसेच नागपूर विभागातून सर्वाधिक ४६.९० हेक्टर क्षेत्रात फळबाग लागवड केल्याबद्दल सरांडी येथील कृषी सहायक विशाल साटकर यांचा आमदार रहांगडाले यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे तालुक्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृषी सहायक रूपेश रिनाईत व नरेश रहांगडाले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.