शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया शहरात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 22:05 IST

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहे. झपाटयाने वाढत असलेली रूग्ण संख्या आजघडीला ३००० पार झाली आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेत बंदचा प्रभावकाही व्यापाऱ्यांचे समर्थन नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव बघता येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्त जनता कर्फ्यूला रविवारपासून (दि.१३) सुरूवात केली आहे. यात रविवारी पहिल्या दिवशी बाजारपेठेत जनता कर्फ्यूला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. मात्र सोमवारी (दि.१४) काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानी उघडून आम्ही सोबत नसल्याचे दाखवून दिले. तरिही बाजारपेठेत संमिश्र जनता कर्फ्यू दिसून आला.जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहे. झपाटयाने वाढत असलेली रूग्ण संख्या आजघडीला ३००० पार झाली आहे. तर दररोज मृतांची संख्याही वाढत असल्याने चिंता अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रूग्ण संख्या वाढ होत असून एकूण रूग्णांच्या ५० टक्के रूग्ण सप्टेंबर महिन्यात आढळून आले आहेत. एकंदर शहराची स्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. अशात वेळीच यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे. यासाठी बाजारपेठ मध्ये होणारी गर्दी नियंत्रणात आणणे गरजेचे असून यासाठीच बाजारपेठेतील काही व्यापाºयांनी पुढाकार अन्य घेत अन्य व्यापाºयांचे समर्थन घेऊन रविवारपासून (दि.१३) जनता कर्फ्यू केला आहे.

रविवारी पहिल्या दिवशी बाजारपेठेत या जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्त प्रतिसाद मिळाला व कडकडीत बंद दिसून आला. मात्र सोमवारी (दि.१४) बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानी उघडून जनता कर्फ्यूला समर्थन नसल्याचे दाखवून दिले. परिणामी सोमवारी बाजारपेठेतही जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळून आल्याचे दिसले. यात दुकान उघडणाऱ्यांचे अत्यंत कमी होते व त्यामुळे चांगलाच बंद दिसून आला. कोरोनाचा वाढता प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठी व्यापारी एकमेकांना सोबत घेऊन आपल्या व आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी बंदचे आवाहन करीत आहेत, हे विशेष.शहरातील अन्य भागात प्रतिसाद नाहीचबाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या या जनता कर्फ्यूला कित्येक व्यापारी संघटनांनी आपले समर्थन दिले आहे. त्यानुसार, बाजारपेठेत कडकडीत बंद ही दिसून येत आहे. मात्र शहरातील अन्य भागांमध्ये नजर टाकल्यास व्यापारी जनता कर्फ्यूच्या समर्थनात नसल्याचे दिसत आहे. शहरातील अन्य भागात नेहमीप्रमाणेच दुकानी सुरू असल्याचे दिसले. यावरून हा जनता कर्फ्यू फक्त बाजारपेठ पुरताच मर्यादीत असल्या सारखे वाटले.बाजारात गर्दी घटलीबाजारपेठ सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असून कोरोनाला आपले पसरण्यासाठी हेच वातावरण पोषण ठरते. त्याचा फटकाही जिल्हा व शहरवासी चांगलाच झेलत आहेत. गर्दी नियंत्रणात आल्यास कोरोनाची साखळी तुटून नक्कीच रूग्ण संख्या घटणार असा विश्वास बाजारातील व्यापाऱ्यांना आहे. त्यांच्या या जनता कर्फ्यूच्या २ दिवसांत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी कमी झाल्याचे दिसले. यामुळे त्यांच्या बंदचे नक्कीच चांगले परिणाम येतील असे म्हणता येईल.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस