शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

तक्रार फेब्रुवारीत अन् कारणे दाखवा मार्चमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता व आपल्या वरिष्ठांना विश्वासात न घेता जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आर. एल. पुराम यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या १० कोटी ३१ लाख रुपयांच्या कामांचे नियोजन केले. याची तक्रार खुद्द खासदार प्रफुल्ल पटेल यांनी फेब्रुवारी महिन्यात केली होती. मात्र, महिनाभर जिल्हा परिषदेने ही गांर्भियाने घेतली नाही. प्रकरण शेकणार हे लक्षात येताच २८ मार्चला पुराम यांना कारणे दाखवा पत्र देऊन दोन दिवसांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्हा परिषदेत मागील दोन वर्षांपासून प्रशासकराज सुरू असून याचा पुरेपूर फायदा काही अधिकारी करून घेत आहेत. सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता व आपल्या वरिष्ठांना विश्वासात न घेता जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आर. एल. पुराम यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या १० कोटी ३१ लाख रुपयांच्या कामांचे नियोजन केले. याची तक्रार खुद्द खासदार प्रफुल्ल पटेल यांनी फेब्रुवारी महिन्यात केली होती. मात्र, महिनाभर जिल्हा परिषदेने ही गांर्भियाने घेतली नाही. प्रकरण शेकणार हे लक्षात येताच २८ मार्चला पुराम यांना कारणे दाखवा पत्र देऊन दोन दिवसांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. जिल्हा परिषदेला १५ व्या वित्त आयोगांतर्गंत विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांना १० लाख रुपयांपर्यंतच्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार आहे. यापेक्षा अधिकच्या निधीची कामे मंजूर करताना मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे. मात्र, गोंदिया जिल्हा परिषदेत मागील दोन वर्षांपासून प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे याचा काही अधिकारी फायदा घेत आहेत. पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आर. एल. पुराम यांनी १५ व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेल्या निधीपैकी १० कोटी ३१ लाख रुपयांच्या कामांचे नियोजन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विश्वासात न घेता तसेच सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता केले होते. ही बाब जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी यावर आक्षेप घेत याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्याकडे व ग्रामविकास मंत्रालयाकडे केली होती. तेव्हा जिल्हा परिषदेने निधी खर्च झालाच नाही. केवळ नियोजन केले असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर याप्रकरणी कुठलीच कारवाई केली नव्हती. यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी याची तक्रार केली. त्यानंतर जिल्हा परिषदेने कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांची नियुक्ती केली. पुंड यांनी २८ मार्च रोजी आर. एल. पुराम यांना कारणे दाखवा नोटीस देत दोन दिवसांत यावर खुलासा सादर करण्यास सांगितले. पुराम यांनी आपले म्हणणे पुंड यांच्यासमोर मांडल्याची माहिती असून आता मुख्य कार्यकारी अधिकारी याप्रकरणी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. 

 प्रशासकराजमुळे मोकळीक- आधी कोरोनामुळे आणि आता ग्रामविकास विभागाच्या निर्देशाअभावी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत मागील दोन वर्षांपासून प्रशासकराज सुरू आहे. यामुळे अधिकाऱ्यांना पूर्णपणे मोकळीक मिळाली असून काही अधिकारी याचा पुरेपूर उपयोग करून घेत असल्याचे चित्र आहे.

बांधकाम विभागावर मेहरबानी जिल्हा परिषद बांधकाम विभाग प्रभारी कार्यकारी अभियंत्यांच्या नियमबाह्य कामांनी चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आला होता. यानंतर १३ कोटी रुपयांच्या निविदेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली होती. प्रभारी कार्यकारी अभियंत्याविरोधात तक्रारींचा पाऊस पडत असतानाही जिल्हा परिषदेकडून वेळकाढू धोरण अवलंबिले जात होते. त्यामुळे बांधकाम विभागावर एवढी मेहरबानी का असा सवाल उपस्थित केला जात होता. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद