शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

ग्रामसेवकासह पाच अधिकाऱ्यांची तक्रार

By admin | Updated: December 11, 2014 23:09 IST

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत करटी बु. (ता.तिरोडा) येथे नवीन नळ पाणी पुरवठा मंजूर झाले. त्यासाठी ८९ लाख ४४ हजार १७१ रूपये बांधकामासाठी मंजूर झाले.

परसवाडा : जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत करटी बु. (ता.तिरोडा) येथे नवीन नळ पाणी पुरवठा मंजूर झाले. त्यासाठी ८९ लाख ४४ हजार १७१ रूपये बांधकामासाठी मंजूर झाले. पण या योजनेच्या कामाला पूर्ण होण्याच्या आधीच भ्रष्टाचाराचे ग्रहण लागून प्रकरण उघड झाले. या प्रकरणात करटी बु.च्या ग्रामसेवकासह पाच अधिकाऱ्यांविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, ९५ नागरिकांच्या नावावर खोटी लोकवर्गनी दर्शवून चार लाख ५० हजार रुपये कंत्राटदारामार्फत भरण्यात आले. ३० नागरिकांनी लोकवर्गणीसाठी आपण एक रुपयासुद्धा दिले नाही. आपणास त्याबद्दल माहिती नाही, असे त्यांनी लेखी लिहून दिले आहे. ग्रामसेवक महाकाळकर यांनी शासनाची दिशाभूल केली आहे. सहा भूवैज्ञानिक, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा गोंदिया यांनी प्रमाणपत्रांच्या टिपमध्ये नवीन विहीर नदीच्या काठावर खोदकाम करून बांधकाम करण्याचे आदेश दिले. पण सदर विहीर जुनीच असून नदीच्या पात्रात असून तिचेच स्त्रोत बळकट करण्याचे सांगितले. ती विहीर नदीपात्रात असल्याने गढूळ पाणी येत आहे. सन १९९० च्या कालावधीत असलेल्या दोन जुन्या विहिरी नदीपात्रात आहेत. त्याच विहिरींनी पाणी पुरवठा सुरू आहे. भूवैज्ञानिक भूजल सर्व्हेक्षण अधिकारी यांनी शासनाची दिशाभूल केली आहे. यात प्रतिदिवस एक लाख ४४ हजार ६४० लिटर प्रतिदिवस पाण्याची मागणी नमूद आहे. विहिरीसाठी ११ लाख आठ हजार ४६८ रूपये मंजूर होते. पण काम न करता जुनी विहीर सन १९९० ची दाखवून सहा लाख ३४ हजार ३९४ रूपये काढण्यात आले. अंदाज पत्रकाप्रमाणे आयटम क्र. २, ५, ६१०, १९ व २० नुसार बांधकाम करणे आवश्यक आहे. तसे मोजमाप पुस्तिकेत नमूद केले आहे. पण विहीर तयार करण्यात आलीच नाही. आयटम क्र. २ मध्ये ५० हजार २४७ रूपये व चार लाख ७४ हजार ७४ रूपये अफरातफर करण्यात आले आहेत. यात पाईपलाईनसाठी मेन पाईप १४० मिमी डाय एचडीपीई ०८ केजीकरिता ३६ लाख ९५ हजार १६२ रूपये एवढे आहे. कंत्राटदाराला २५ लाख ६७ हजार ८२ रूपये देण्यात आले आहे. पण मोजमाप पुस्तिकेत नोंदीनुसार आयटम क्र.५- नग ४२०० दर ५७६ नुसार २४ लाख १९ हजार २०० रूपये एवढे आहे. यात एक लाख पाच हजार ४०८ रुपयांची अफरातफर झाली आहे. नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. पण संपूर्ण गढूळ पाणी येत असून सन २०१०-११ मध्ये गढूळ पिण्याच्या पाण्यामुळे करटी बु. गावात डायरियाची साथ आली होती. सन २०१२-१३ मध्ये नवीन योजना मंजूर झाली. नवीन विहीर नदी काठावर बांधणे आवश्यक होते. पण तसे न करता पाण्याच्या पात्रात असलेल्या जुन्या विहिरीलाच दाखविण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात कंत्राटदार, ग्रामसेवक, सरपंच, अध्यक्ष, सचिव, सदस्य ग्राम आरोग्य पोषण व पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामपंचायत, सहायक भूवैज्ञानिक, कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद यांची साठगाठ असल्याने भ्रष्टाचार झाला आहे. सदर कामाची चौकशी करून या संपूर्ण अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी व भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ क्र.४९ कलम १७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रंजीत आर. बागडे करटी बु. यांनी पोलीस अधीक्षक गोंदिया, मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. गोंदिया, आयुक्त नागपूर, लोकआयुक्त मुंबई यांना लेखी तक्रार केली आहे. सर्व प्रकरण माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. (वार्ताहर)