शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
3
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
4
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
5
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
6
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
7
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
9
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
10
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
11
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
12
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
13
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
14
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
16
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
17
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
18
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
19
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
20
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक

स्पर्धात्मक परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र विचाराधीन-बडोले

By admin | Updated: December 29, 2014 01:41 IST

जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात दहावी व बारावी शिकलेल्या बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमूख बनविण्याचे विचाराधीन आहे.

अर्जुनी/मोरगाव : जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात दहावी व बारावी शिकलेल्या बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमूख बनविण्याचे विचाराधीन आहे. नवबौद्ध व्ही.जे. एन.टी. प्रवर्गातील या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळू शकतो. जिल्ह्यात स्पर्धात्मक परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र विचाराधीन असल्याचे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. ते भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, मंत्रीपद मिळाले हा माझा नाही तर जनताजनार्दनाचा सन्मान आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मेळावा घेण्याचा प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला येणार. यासाठी शेतकऱ्यांनी हिरमुसून जाऊ नये, असा दिलासा शेतकऱ्यांना दिला. राज्य सरकारवर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने तिजोरीवर दरोडा टाकून आर्थिक व्यवस्था खोकली केली. २६ जानेवारीपर्यंत एक शिबिर घेऊन जास्तीत जास्त लोकांना वनजमिनीचे पट्टे उपलब्ध करुन देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोेलणी झाली असल्याचेही सांगीतले. तसेच झाशीनगर उपसा सिंचन योजनेचा एक टप्पा मार्चपर्यंत पूर्ण होणार व येत्या तीन ते चार महिन्यांत या योजनेचे पाणी नवेगावबांध तलावात पडेल. तर बोंडगावदेवी पर्यंतच्या शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. याशिवाय कलपाथरी सिंचन प्रकल्प, उपाशा नाल्याचा वनजमिनीचा प्रश्न, डव्वा मायनर, जुनेवानी तलावासाठी निधीची तरतूद, १३२ के.व्ही. विद्युत उपकेंद्राचा प्रस्ताव, अर्जुनी मोरगाव तालुक्यासाठी १०० विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेचा प्रस्ताव या विषयांवर सुद्धा सातत्याने अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू असून हे सर्व प्रश्न निकाली काढू असेही ते म्हणाले. समाजकल्याण विभागाचे जिल्हा व राज्य असे दोन भाग आहेत. यात अनेक आश्रमशाळा, वस्तीगृहांचा समावेश असतो. वस्तीगृहाचे निरीक्षणच होत नाही. भविष्यात यासाठी तालुकास्तरापर्यंत कर्मचारी नेमून व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी मंचावर माजी आ. दयाराम कापगते, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, प्रभारी तालुकाध्यक्ष रघुनाथ लांजेवार, जि.प.चे बांधकाम व अर्थ सभापती प्रकाश गहाणे, पं.स.चे सभापती तानेश ताराम, जि.प.चे समाजकल्याण सभापती कुसन घासले, कृउबासचे सभापती काशिम जमा कुरेशी, नामदेव कागपते, अ‍ॅड. दिलीप कातोरे, प्रमोद लांजेवार, जि.प.सदस्य मधुकर मरस्कोल्हे, अरविंद शिवणकर, रुपाली टेंभुर्णे, लुनकरण चितलांगे, सरपंच किरण खोब्रागडे, दिलीप चौधरी, केवळराम पुस्तोडे, उमाकांत ढेंगे उपस्थित होते.याप्रसंगी खा. पटोले म्हणाले, आता आमची जबाबदारी वाढली आहे. जनतेचे ऋण फेडायचे आहे. तालुक्यात सिंचन, रोजगार, शेतकरी, बेरोजगार व जातीधर्माचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची आहे. काँग्रेस -राकाँ सरकारने आमचे हक्काचे पाणी अदानीला विकले. शेतीला सिंचन व शेतीवर आधारीत उद्योग निर्मिती यासाठी प्रयत्न केले जातील. सामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्यांची चमू आणली पाहिजे. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. संचालन रचना गहाणे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)काळे झेंडे दाखविलेच नाहीशेतकऱ्यांना धानावर उत्पादित भाव मिळावा, विजेचे बिल माफ करावे, जिल्ह्यात शेतकऱ्यांची दैनावस्था असताना दुसरीकडे आमदारांचा सत्कार होतो. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखविण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. मात्र पोलिसांनी को-आॅप बँक चौकात त्यांना अडकविले. त्यामुळे काळे झेंडे दाखविण्याचा कार्यक्रम फसला. या कार्यक्रमाचे नेतृत्व मनोहर चंद्रीकापुरे, जीवन लंजे, बंडू भेंडारकर, नामदेव डोंगरवार, शीला उईके, शीला दखणे, चित्ररेखा मिश्रा, सोनदास गणवीर, राकेश लंजे, गोवर्धन ताराम करणार होते. धानाला तीन हजार रुपये क्विंटल भाववाढ मिळावी, विद्युत दरवाढ मागे घ्यावी या मागण्यांचा समावेश होता.खरेदी विक्री समितीने वर्षभरापूर्वी गाळे भाड्याने दिले. मात्र या व्यापारी संकुलाचे उद्घाटन रविवारी (दि.२८) ना. राजकुमार बडोले यांनी केले. खरेदी विक्री समितीच्या या कार्याची चर्चा समारंभस्थळी होती.