लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी महापुरामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनेक गावांसह गोंदिया तालुक्यातील २८ गावांना फटका बसला होता. त्यात गोंदिया तालुक्यातील एकूण ४३१४ शेतकऱ्यांचे १८२७ हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ७५८ हेक्टरमधील पिकांचे अल्प प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र या शेतकऱ्यांना अद्यापही कसलाही मोबदला मिळाला नव्हता. लोकमतने हा मुद्दा लावून धरला होता. आ.विनोद अग्रवाल यांनी विधानसभेत लोकमतमधील वृत्ताचे कात्रण दाखवून हा मुद्या लावून धरुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.सन २०१७ मध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्यात १ लाख १९ हजार ५०४ शेतकऱ्यांचे अर्ज आले होते. त्यातील ८४ हजार २२१ अर्ज पात्र ठरले होते. ज्यात ७७ हजार ८३५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. उर्वरित ७ हजार शेतकऱ्यांचे अर्ज कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून सुद्धा त्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागले.या ७ हजार शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार की नाही असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आहे.मागील कर्जमाफीत अर्ज पात्र ठरून सुद्धा कर्जमाफी न मिळालेल्या शेतकºयांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याची व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यां शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत या योजनेचा लाभ देण्याची मागणी आ. अग्रवाल यांनी केली.गोदामांची व्यवस्था करायावर्षी धानाचे उत्पादन बऱ्यांपैकी झाले असून धान विक्रसाठी विविध ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. मार्केटिंग फेडरेशन जवळपास ३० लाख क्विंटल धान खरेदी करणार असून आत्तापर्यंत २६ लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. मात्र मार्केटिंग फेडरेशनकडे ३ लाख क्विंटल धान साठवण करण्याची क्षमता आहे. परिणामी पंधरा पंधरा दिवस धानाची उचल होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. उघड्यावरील धानाला पाऊस आणि गारपिटीचा सुध्दा फटका बसला. शासनाने धानाची साठवणूक करण्यासाठी गोदामांची व्यवस्था करावी अशी मागणी सभागृहात आ. विनोद अग्रवाल यांनी केली.सुधारित वीज बिलाचे वाटप कराजिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वापरापेक्षा अतिरिक्त बिल पाठविण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर असून शेतकºयांना विज बिलात दुरूस्ती करुन नवीन बिल वाटप करण्याची मागणी केली.