गोंदिया : जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असून जैवविविधता व वन्यजीवसृष्टी मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करुन स्थानिकांसाठी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती कशी होईल याचे नियोजन करण्यात येत असून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करु न जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी किटबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. रविवारी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त कारंजा येथील पोलीस कवायत मैदानात मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री बडोले बोलत होते. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी परेडचे निरिक्षण करुन मानवंदना स्विकारली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जि.प. शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी. कटरे, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर प्रामुख्याने उपस्थिते होते. पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जयंतीचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष राज्यात आदर भावनेने साजरे करण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेबांनी वास्तव्य केलेले लंडन येथील घर राज्य शासनाने खरेदी करु न त्याचे जागतिक पातळीवरील स्मारकात रुपांतर केले. इंदू मिलच्या जागेवर लवकरच डॉ.आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येईल. नागपूरच्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वर्ष वरु न ६० वर्ष करण्यात आली आहे. बार्टीच्या माध्यमातून बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराभिमुख व स्वावलंबी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील भिमघाट, कोरनीघाट, कालीमाटी व बुद्धभूमीच्या विकासासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. तेंदूपाने संकलनातून जिल्ह्यातील ४५ हजार मजूरांना वनावर आधारित रोजगार मिळाल्याचे सांगून बडोले यांनी, अभयारण्य व वनालगतच्या गावातील १४ हजार १९७ कुटुंबांना एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्यामुळे त्यांचे वनांवर असलेले अवलंबित्व कमी झाले आहे. महाराजस्व अभियानातून महसूल प्रशासन लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक झाल्याचे त्यांनी सांगितले. मामा तलावात रोहयोतून मत्स्यबीज संगोपन व संवर्धन तळ््यांचे बांधकाम करणार असल्याचे सांगीतले. तर जिल्ह्यातील गोरगरीब रु ग्णांना चांगली व मोफत सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत, क्षयरु ग्ण विभागात लावण्यात आलेली सीबी नेट ही महागडी मशिन क्षयरुग्णांसाठी वरदान ठरली आहे. ४६४४ रु ग्णांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे. ४ ते २५ मे दरम्यान लाईफ लाईन एक्स्प्रेसच्या आरोग्य सेवेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त रु ग्णांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. तसेच जिल्ह्यातील ५१४४ शेतक ऱ्यांनी सावकाराकडून घेतलेले ५ कोटी ८८ लक्ष रुपये कर्ज शासनाने माफ केल्याचे त्यांनी सांगितले. परेडचे संचलन परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी केले. यावेळी पेलीस विभागाचे पुरु ष व महिला दल, गृहरक्षक पुरु ष व महिला दल, शीघ्र कृती दल, श्वान पथकाने पथसंचलन करु न राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. अग्नीशमन, रु ग्णवाहीकांनी परेडमध्ये सहभाग घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीश कळमकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड, यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन करून आभार मंजुश्री देशपांडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार ४यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्काराने तालुक्यातील तलाठी आर.एस.बोडखे यांना सन्मानीत करण्यात आले. पुरस्कारादाखल मिळालेली रक्कम बोडखे यांनी मुख्यमंत्री मदत निधीसाठी पालकमंत्र्यांना दिली. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल पोलीस उपनिरिक्षक अविनाश गडाख, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पेटकुले, रमेश येळे, पोलीस हवालदार शेखर सोनवाने, उमेश इंगळे, वामन पारधी, राधेश्याम गाते, प्रकाश डुंबरे, वरिष्ठ गुप्त वार्ता अधिकारी रामारेड्डी जिहाटावार, राजा भिवगडे यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट स्काऊट-गाईड म्हणून अंशुक उगदे, मुन्नालाल बागडे, विकास झिंगरे, पंकज रहांगडाले, पुनम रामटेके, निकिता कटरे या विद्यार्थ्यांचा तर येथील उड्डाणपुलावरील अपघातातील युवकांना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करु न त्यांचे प्राण वाचिवल्याबद्दल कुशल अग्रवाल यांचा प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मागेल त्याला शेततळे या योजनेचा कार्यारंभ आदेश प्रकाश पटले (मजीतपूर), जगन्नाथ रेवतकर (खर्रा), संतोष गायधने (गंगाझरी), सुरजलाल भगत (धामनीवाडा), देवानंद रहांगडाले (खातीटोला) या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
पर्यटनासह मानव विकास वाढविण्यासाठी कटिबद्ध
By admin | Updated: May 2, 2016 01:49 IST