शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

व्यापारातील गैरप्रकार टाळण्यासाठी पुढे यावे

By admin | Updated: May 31, 2014 23:34 IST

व्यापारी शहर असणार्‍या गोंदियात ग्राहकांची विविध प्रकारे लुबाडणूक होऊ शकते. व्यापारातील गैरप्रकार थांबविण्यासाठी ग्राहकांनी जागरूक होऊन पुढे आले आहे. त्यांना न्याय देण्यासाठी ग्राहक

ग्राहकांना आवाहन : पंचायतचे अध्यक्ष आळशी यांनी लावली प्रकरणे मार्गीगोंदिया : व्यापारी शहर असणार्‍या गोंदियात ग्राहकांची विविध प्रकारे लुबाडणूक होऊ शकते. व्यापारातील गैरप्रकार थांबविण्यासाठी ग्राहकांनी जागरूक होऊन पुढे आले आहे. त्यांना न्याय देण्यासाठी ग्राहक मंच सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष अतुल आळशी यांनी दिली. ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी व्यापारातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी ग्राहकांनी पुढे येण्याचे आवाहन केले.गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून गोंदिया जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचला स्थायी अध्यक्ष नसल्यामुळे मंचचा कारभार ढेपाळला होता. त्यामुळे अन्याय झाल्याचे लक्षात येऊनही अनेक ग्राहक मंचकडे तक्रार देण्यास धजावत नव्हते. मात्र गेल्या २८ जानेवारी २0१४ रोजी मंचचे अध्यक्ष म्हणून अतुल आळशी यांनी कार्यभार स्वीकारला आणि जिल्हा ग्राहक मंचला पुनरूज्जीवित केले. त्यांच्याकडे भंडारा जिल्हा ग्राहक मंचचाही कार्यभार असल्यामुळे दि.१५ ते ३0 असे १५ दिवसच ते गोंदियात उपलब्ध असतात. अर्थात गेल्या प्रत्यक्ष कामाचे दिवस विचारात घेतल्यास अवघ्या २ महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी प्रलंबित असलेली २५ प्रकरणे निकाली काढली. याशिवाय ३0 नवीन प्रकरणे दाखल करून घेतली. या बहुतांश प्रकरणांमध्ये तक्रारकर्त्या ग्राहकांना योग्य न्याय मिळाला आहे.अत्यंत माफक खर्चात (२00 ते ५00) आणि जास्तीत जास्त ६ ते ७ महिन्यात प्रकरणांचा निपटारा केल्या जात असल्यामुळे कोणत्याही ग्राहकाला जिल्हा  ग्राहक तक्रार निवारण मंचाच प्रकरण दाखल करणे कधीही परवडणारे असते. फक्त ग्राहकाने एखादी वस्तू किंवा सेवा घेतल्याचा पुरावा तेवढा जवळ बाळगणे गरजेचे आहे. मात्र इतर न्यायालयांसारखा किचकट पुरावा नसला तरी ग्राहकाच्या बाजुने निकाल लागू शकतो, असे न्या.आळशी यांनी सांगितले.पैसे देऊन घेतलेली कोणतीही सेवा ही ग्राहक मंचच्या कक्षेत येते. गोंदिया जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या अपघात विम्याची प्रकरणे बरीच आली. त्यापैकी ९५ टक्के प्रकरणांमध्ये शेतकर्‍यांच्या कुटुंबियांच्या बाजुने न्यायनिवाडा झाला. याशिवाय वीज वितरण कंपनी, खासगी विमा कंपन्या, एलआयसी, जनरल इन्शुरन्स कंपन्या, एवढेच नाही तर डॉक्टरांच्या विरूद्धच्याही केसेस जिल्हा ग्राहक मंचाकडे आल्या आहेत. खासगी विमा कंपन्या सुरूवातीला ग्राहकांना प्रलोभन दाखवत असल्या तरी प्रत्यक्ष मदत देताना अनेक पळवाटा काढत पैसे देण्याचे टाळतात. परंतू ग्राहक मंचाने त्यांना तसे करण्यापासून परावृत्त केल्याचे न्या.आळशी यांनी सांगितले.ग्राहकांमध्ये आपल्या हक्काविषयी जागृती आणण्यासाठी मंच वेळोवेळी अधिवेशन घेत असते. ग्राहकाला कायदेशिर संरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करते. अनुचित प्रकार घडल्यापासून २ वर्षाच्या आत ग्राहकाला मंचाकडे तक्रार दाखल करता येते. परंतू एखाद्या वेळी विलंब झाला आणि त्याचे कारण संयुक्तिक असेल तर ते प्रकरण आम्ही दाखल करून घेतो, असेही अध्यक्ष अतुल आळशी यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)