शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

गोंदिया विदर्भात सर्वात थंड @ १३ अंश सेल्सिअस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

यंदा हिवाळा सुरू झाला असूनही आतापर्यंत पाहिजे तशी थंडी पडलेली नाही. तापमानाची चढ-उतार सुरूच असून, यंदाचा हिवाळा नेमका कसा जाणार हेच समजेनासे झाले आहे. यामुळेच गुलाबी थंडीची खरी मजा जिल्हावासीयांना अनुभवता आलेली नाही. मात्र आता जिल्ह्यातील तापमानात घट होत असताना दिसत असून, थंडीही जाणवू लागली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :   जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस घट होत असून, मंगळवारी (दि.१४) जिल्ह्यातील तापमान १३ अंश सेल्सिअसवर आले होते. विशेष म्हणजे, आतापर्यंत सर्वात थंड जिल्हा म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहणार गोंदिया जिल्हा मंगळवारी प्रथम क्रमांकावर आला होता. यामुळे आता गुलाबी थंडीला सुरुवात झाल्याचे दिसत असून, त्याचा अनुभव सुद्धा जिल्हावासीयांना येत आहे. यंदा हिवाळा सुरू झाला असूनही आतापर्यंत पाहिजे तशी थंडी पडलेली नाही. तापमानाची चढ-उतार सुरूच असून, यंदाचा हिवाळा नेमका कसा जाणार हेच समजेनासे झाले आहे. यामुळेच गुलाबी थंडीची खरी मजा जिल्हावासीयांना अनुभवता आलेली नाही. मात्र आता जिल्ह्यातील तापमानात घट होत असताना दिसत असून, थंडीही जाणवू लागली आहे. रविवारी (दि.१२) जिल्ह्याचे तापमान १४.६ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले, तर सोमवारी (दि.१३) तापमान आणखी घटले असून, १३.५ एवढी नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी (दि.१४) त्यात आणखी घट झाली असून, १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तापमानात जसजशी घट होत आहे तसतसा थंडीचा जोर वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळेही आणखी थंडी जाणवत असल्याचाही अनुभव येत आहे. यामुळेच आता जिल्हावासीयांना उबदार कपड्यांची गरज भासत आहे. दिवसेंदिवस होत असलेली तापमानातील घट बघता येत्या काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचे दिसत आहे.

गरम कपडे आता निघाले - सोमवारपासून जिल्ह्याचे तापमान १३ अंश सेल्सिअसच्या घरात आले आहे. त्यात मंगळवारी आणखी घट झाल्याने जिल्ह्यात थंडीने एंट्री मारली आहे. सकाळी व सायंकाळ होताच आता जिल्हावासीयांना थंडी जाणवू लागली असून, ठेवलेले गरम कपडे आता त्यांना घालावे लागत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी विदर्भात गोंदिया जिल्हा सर्वांत थंड जिल्हा होता, तर वर्धा जिल्हा १३.२ अंश सेल्सिअसवर आल्याने दुसऱ्या क्रमांकावर होता.

 

 

टॅग्स :weatherहवामान