शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले, औषधांच्या मागणीत झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST

उपचारासाठी रुग्णालयांत गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंतचे रुग्णालय हाऊस फुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे.  सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून, यापासून काळजी घेण्याची गरज आहे. मागील आठवडाभरापासून वातावरणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कधी ऊन तर कधी पाऊस यामुळे सतत वातावरणात होणाऱ्या बदलामुळे लोकांवर वातावरणाचा परिणाम झाला. घरोघरी सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे आढळणारे रुग्ण घरोघरी दिसू लागली आहेत. कोरोनाही पाय पसरू लागला आहे. आपल्याला कोरोना तर झाला नाही, या धास्तीत लोक आहेत. आजघडीला मेडिकलमध्ये सर्दी, खोकल्याची औषधी घेणारे लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत.गोंदिया शहराबरोबर ग्रामीण भागातही व्हायरल फिव्हरचा जोर असल्याने गावागावात सर्दी-तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. उपचारासाठी रुग्णालयांत गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंतचे रुग्णालय हाऊस फुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे.  सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून, यापासून काळजी घेण्याची गरज आहे. मागील आठवडाभरापासून वातावरणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच आजाराच्या रुग्णांची सुध्दा सध्या शासकीय रुग्णालयात गर्दी वाढत असल्याचे डॉक्टरांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. 

शासकीय रूग्णालयातील ओपीडी वाढली- साधी सर्दी, खोकला किंवा ताप रूग्ण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जात असल्याने शासकीय रुग्णालयातील ओपीडी वाढली आहे.- ताप असलेल्या व्यक्तीने घरच्यांपासून वेगळे राहावे, लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करून घ्यावी, आरोग्य यंत्रणेचा सल्ला घेऊनच उपचार घ्यावा. 

तर करा कोरोना चाचणीसर्दी, खोकला किंवा ताप अशी लक्षणे आढळताच कोरोनाची चाचणी करण्यासाठी लोकांनी पुढे यावे. कोरोनाची चाचणी करण्यासाठी स्वेच्छेने लोक रुग्णालयात आले तरच त्यांची चाचणी केली जाते. दिवसाकाठी दररोज १००० लोकांची चाचणी गोंदिया जिल्ह्यात केली जात आहे. 

बदललेले वातावरण हेही कारणसद्यस्थितीत ऊन, पाऊस, मधातच थंडी असा सतत बदल वातावरणात होत असल्यामुळे या वातावरणाचा फटका मानवी शरीरावर पडत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत.

दहापैकी आठ रुग्ण सर्दी खोकल्याचे

सध्या आमच्या मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी येणाऱ्या दहापैकी आठ लोक हे सर्दी, खोकलाची औषधी घेण्यासाठी येत आहेत. खोकल्याच्या औषधांमध्ये सर्वाधिक मागणी अडुळसा या औषधीला आहे.- राजेश अग्रवाल, मेडिकल चालक आमगाव.

आमच्या मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी येणाऱ्या सर्वाधिक चिठ्ठी ह्या सर्दी, खाेकला या औषधांच्याच आहेत. डॉक्टरांच्या आलेल्या चिठ्ठींमध्ये दहापैकी सात ते आठ चिठ्ठी ह्या खोकला आणि सर्दीच्या औषधांच्या असतात.- रामभाऊ पाऊलझगडे, मेडिकल चालक ठाणा

 

टॅग्स :Healthआरोग्यmedicineऔषधं