शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्वच्छता सर्वेक्षणात गोंदिया पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:23 IST

स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्र्धेत गोंदिया शहर पास झाले आहे. गोंदियाने या स्पर्धेत देशातून ७६ तर राज्यात १७ वा क्रमांक पटकाविला असून टॉप १०० मध्ये यंदा स्थान मिळविले आहे. नगर परिषदेची मेहनत व शहरवासीयांचे सहकार्याचे हे फलीत आहे.

ठळक मुद्देदेशात ७६ तर राज्यात १७ व्या क्रमांकावर : टॉप शंभरमध्ये मिळविले स्थान

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्र्धेत गोंदिया शहर पास झाले आहे. गोंदियाने या स्पर्धेत देशातून ७६ तर राज्यात १७ वा क्रमांक पटकाविला असून टॉप १०० मध्ये यंदा स्थान मिळविले आहे. नगर परिषदेची मेहनत व शहरवासीयांचे सहकार्याचे हे फलीत आहे.स्वच्छतेच मूलमंत्र घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या घराप्रमाणेच आपला देशही स्वच्छ असावा ही संकल्पना मांडून स्वच्छ भारत मिशन ही मोहीम छेडली आहे. यातच देशातील शहरांना स्वच्छतेच्या या मोहिमेत प्रोत्साहीत करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा सुरू केली आहे. यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ४८५ शहरांनी यात सहभाग घेतला. यात गोंदिया शहराने देशातून ७६ तर राज्यातून १६ वा क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे, स्वच्छता सर्वेक्षणाच्या परीक्षेत पास झालेल्या गोंदिया शहराने यंदा टॉप १०० मध्ये स्थान मिळविले आहे. स्वच्छता सर्वेक्षण २०१७ मध्ये ३४३ व्या क्रमांकावर असलेल्या गोंदिया शहराच्या या निकालाने शहरात नक्कीच काहीतरी बदल झाल्याचे स्पष्ट होते.यासाठी नगर परिषदेनेही चांगलीच मेहनत घेतली असून या सर्व गोष्टींच्या आणि सर्वांच्या प्रयत्नांचे फलीतही यंदाच्या निकालातून नगर परिषदेला मिळाले आहे.टीमवर्कची कमालस्वच्छता सर्वेक्षणाला घेऊन नगर परिषदेच्या सफाई विभागासह अवघ्या नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांची दिवसरात्र एक केल्याचे बघावयास मिळाले. शहराला यंदा चांगला क्रमांक मिळवून देण्यासाठी मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्या नेतृत्वात प्रत्येकानेच धडपड केली. शिवाय शहरवासीयांचे सहकार्यामुळे आणि टीम वर्कची ही कमाल असल्याचे बोलले जात आहे.या बाबी ठरल्या फायद्याच्यास्वच्छता सर्वेक्षणांतर्गत शहरातील स्वच्छता व त्यासाठी शहरवासीयांनी केलेले सहकार्य ही बाब जमेची ठरली. मात्र त्याशिवाय, ओला कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी गांडूळ खत निर्मिती, सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती व स्वच्छता, बाजार व रहिवासी परिसरात रात्रीची स्वच्छता तसेच कचरा वर्गीकृत करून गोला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ओला व सुका कचºयाच्या कुंड्या या बाबी सर्वेक्षणात गुण मिळवून देण्यासाठी फायदेशिर ठरल्या.घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाने केला घातनगर परिषदेकडे आतापर्यंत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. त्यामुळे नगर परिषदेला कचºयाची विल्हेवाट लावताना मोठी कसरत करावी लागते. परिणामी शहरातील केरकचºयाची नियमित विल्हेवाट लावली जात नाही. नेमकी हीच बाब नगर परिषदेला स्वच्छता सर्वेक्षणात भोवली. नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने येथेच समितीने गुण देताना काटकसर केल्याचे बोलल्या जाते.नगर परिषदेला मिळालेले गुणप्रत्यक्ष पाहणी१२०० पैकी १११६नागरिकांचा अभिप्राय१४०० पैकी ११७७प्रत्यक्ष कामगिरी१४०० पैकी ५१४