शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी सण-उत्सव शांततेत साजरे करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:11 IST

सोमवारी(दि.२६) ग्रामीण पोलीस स्टेशनच्या परिसरात आयोजित शांतता व सलोखा समितीच्या मार्गदर्शक सभेत ते बोलत होते. पोळा (मारबत) उत्सव येत असून लगेचच गणेश उत्सवाला प्रारंभ होणार आहे. याच दरम्यान मुस्लीम बांधवाचा मोहर्रम हा सण सुध्दा येत आहे.

ठळक मुद्देमनोहर दाभाडे : शांतता समिती सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या सणांचे दिवस सुरु असून ग्रामीण भागात या उत्सवांना अनन्य साधारण महत्त्व आहे. नागरिक आपआपल्या परीने ही सण उत्सव साजरे करीत असतात. तेव्हा या काळात कोणतीही शांतता भंग होईल असे कार्य न करता नागरिकांनी सण उत्सव शांततेत साजरे करावे असे आवाहन ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे यांनी केले आहे.सोमवारी(दि.२६) ग्रामीण पोलीस स्टेशनच्या परिसरात आयोजित शांतता व सलोखा समितीच्या मार्गदर्शक सभेत ते बोलत होते. पोळा (मारबत) उत्सव येत असून लगेचच गणेश उत्सवाला प्रारंभ होणार आहे. याच दरम्यान मुस्लीम बांधवाचा मोहर्रम हा सण सुध्दा येत आहे. ही सण, व्रत, उत्सव ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरे करण्यात येतात. त्यातच काही माथेफिरु गावातील शांतता व सलोखा भंग करुन शांतमय वातावरणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपले सण उत्सव आनंदाने साजरे करुन पोलीस प्रशासनाला मदत करावी असे आवाहन दाभाडे यांनी केले.कायदा हातात घेऊन शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीवर पोलीस प्रशासन कठोर कार्यवाही करेल असा इशारा सुध्दा त्यांनी यावेळी दिला.गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते व डी.जे.संचालक यांनी परवानगी घेऊनच कार्यक्रम आयोजित करावे असे सांगितले. या वेळी शांतता व सलोखा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलीस मित्र,डी.जे.संचालक व गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन पोलीस हवालदार शेखर खोब्रागडे यांनी केले तर आभार मिश्रा यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Policeपोलिस