कोरोना विषाणूचा वाढत असलेला संसर्ग लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना आणि नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे मागील काही दिवसात कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यामुळे कोरोना कालावधीत लागू केलेले कडक निर्बंध हळूहळू शिथिल केल्यानंतर जनजीवन सुरळीत सुरू झाले होते; मात्र कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रत्येकाने तोंडावर मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे बंधनकारक असताना नागरिकांकडून याचे पालन होताना दिसून येत नाही. कोरोना लसीकरण सामान्य नागरिकांपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागेल, याची काहीच निश्चितता नाही. त्यामुळे सध्यातरी कोरोनापासून बचावासाठी मास्क लावणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला सुरक्षित ठेवावयाचे असेल तर प्रत्येक नागरिकांनी तोंडावर मास्क लावल्याशिवाय विनाकारण घराबाहेर पडू नये, असे वैद्यकीय अधिकारी डॉ.पिंकु मंडल यांनी कळविले आहे.
केशोरीसह परिसरातील नागरिकांना पडला मास्कचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:41 IST