शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

एटीएम सेवा बंद पडल्याने नागरिकांची पंचाईत

By admin | Updated: October 25, 2014 22:43 IST

दिवाळीची लगबग अद्यापही सरलेली नाही. सर्वत्र खरेदीची धावपळ दिसून येत आहे. यासाठी बँकांच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी बहुतेक जण धाव घेत आहेत. परंतु शहरातील बहुतांश एटीएम

गोंदिया : दिवाळीची लगबग अद्यापही सरलेली नाही. सर्वत्र खरेदीची धावपळ दिसून येत आहे. यासाठी बँकांच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी बहुतेक जण धाव घेत आहेत. परंतु शहरातील बहुतांश एटीएम नेमक्या याच वेळेवर बंद असल्याचे दिसत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. यामुळे अनेकांना नाईलाजाने शाखेत जाऊन रांगेत उभे राहून पैसे काढावे लागत आहेत.आजघडीला नागरिक आपले सर्व आर्थिक व्यवहार बँकेमार्फत करीत आहेत. यामुळेच जवळ जास्त रोख रक्कम बागळण्याचे टाळत आहेत. अशात एटीएम सेवा अत्यंत महत्वाची व महत्त्वपूर्ण ठरत असून गरज असेल तेव्हा एटीएममधून पैसे काढले जातात. गावागावांत एटीएमची सेवा बँकांमार्फत उपलब्ध केल्याने व्यवहारातही सहजता आली आहे. पण, वर्षभर साथ देत असलेले एटीएम नेमके दिवाळसणाच्या मुहूर्तावर बेईमान होत असल्याचे पहावयास मिळत आहे. दिवाळी निमित्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एटीएममधून पैसे काढल्याने बहुतांश एटीएम बंद पडले आहेत. मोठ्या आशेने लोकं पैसे काढण्यासाठी एटीएमकडे जात आहेत. मात्र त्यांना आल्यापावली परतावे लागत आहे. सध्या बघावे त्या एटीएमच्या दारावर एटीएम बंद असल्याचे फलक टांगलेले दिसून येत आहे. तर काहींकडून लिंक फेल असल्याचे कारण सांगीतले जात आहे. दिवाळीमुळे सर्वांचीच खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. रोख रक्कम जवळ न बाळगता शहरात खरेदीला जाताना तेथीलच एटीएममधून पैसे काढून खरेदी करण्याचा विचार सर्व जण करीत असतात. पण, शहरात आल्यावर त्यांना बंद एटीएमचा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार २० आॅक्टोबरपासून बघावयास मिळत आहे. याबाबत एटीएमवर असलेल्या गार्डला विचारणा केली असता पैसे नसल्याचे कारण तो पुढे करून हात मोकळे करून घेतो. मात्र यामुळे शहरातील बहुतांश एटीएम बंद पडले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अन्य कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पाच वेळा पैसे काढण्याची सुट देण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास काही रक्कम वजा केली जाते. यामुळे शक्य होईल तेव्हा ग्राहक आपले खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधूनच पैसे काढण्यावर जोर देतात. दिवाळीत मात्र अनेकांना कित्येकदा पैसे काढावे लागत असून त्याची पर्वा न करता ते पैसे काढून घेतात. सध्या मात्र एटीएम बंद पडून असल्याने नागरिकांनी पैशां अभावी चांगलीच पंचाईत होत आहे. त्यातही येत्या २७ आॅक्टोबर पर्यंत बँकांना सुट्टी असल्याने एटीएम मध्ये पैसे भरणेही अशक्यच वाटत आहे. परिणामी आणखी दोन-तीन दिवस नागरिकांना एटीएम सेवा बंद असल्याचा फटका सहन करावा लागणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. (शहर प्रतिनिधी)