शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या मागणीसाठी धानोलीवासीयांचे चूल बंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 16:41 IST

चार दिवसांपासून सुरू आहे उपोषण : शासन, प्रशासन दखल घेईना; गावकऱ्यांत रोष

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सालेकसा तालुक्यातील धानोली ते बाम्हणी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. धानोली ते बाम्हणी हा ५ किमीचा रस्ता तयार करण्यात यावा यासाठी धानोली येथील गावकऱ्यांनी ५ सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. पण शासन व प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची अद्यापही दखल न घेतल्याने सोमवारी (दि.९) येथील गावकऱ्यांनी चूलबंद आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

धानोली-बाम्हणी रस्ता निर्माण समिती स्थापन करून या समितीच्या माध्यमातून शासनाकडे रस्ता बांधकामासाठी वांरवार पाठपुरावा करण्यात आला. पण प्रशासनाने याची दखल न घेतल्याने धानोली येथील नवयुवक राहुल इंद्रसेनग बघेले, श्यामू सीताराम मेश्राम, होमेंद्र देवचंद कटरे, जितेंद्र भूमेश्वर टेंभरे, अक्षय जयचंद डोंगरे ५ सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले. पण याची प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे समस्त गावकऱ्यांनी सोमवारी (दि.९) चूलबंद आंदोलन करून आंदोलनस्थळी एकत्र येत युवकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. शनिवारी (दि.७) आ. सहषराम कोरोटे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. 

मात्र उपोषणकर्त्यांची समजूत काढण्यास व समस्या मार्गी लावण्यास त्यांना यश आले नाही. जोपर्यंत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका युवकांनी घेतली आहे. तर युवकांच्या या उपोषणाला ग्रामपंचायत दरबडा, घोंसी, बोदलबोडी, पिपरटोला, गिरोला, नानव्हा, भजेपार, बाम्हणी, भजेपार, सोनारटोला या गावातील गावकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. 

पाच किमीच्या रस्त्यासाठी शासनाकडे निधी नाही का? धानोली ते बाम्हणी रस्ता तयार करण्यात यावा याकरिता गेल्या ४० वर्षापासून गावकरी शासन आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. पण शासनाने अद्यापही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना उपोषण करण्याची वेळ आली. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. मग या पाच किमीच्या रस्त्यासाठीच शासनाकडे निधी नाही असा सवाल येथील गावकऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकgondiya-acगोंदिया