शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगावजवळील चिखलीत फुलतेय आमराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:43 IST

हवामानातील बदलाचा शेतीवर झपाट्याने परिणाम होत आहे. दर दोन तीन वर्षांनी निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे डोंगर वाढत आहे. केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघने कठीण झाल्याने शेती म्हणजे तोट्याचा सौदा अशी भावना शेतकºयांमध्ये निर्माण होत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । कमी लागवड खर्चात अधिक उत्पादन : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळतोय पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : हवामानातील बदलाचा शेतीवर झपाट्याने परिणाम होत आहे. दर दोन तीन वर्षांनी निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे डोंगर वाढत आहे. केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघने कठीण झाल्याने शेती म्हणजे तोट्याचा सौदा अशी भावना शेतकºयांमध्ये निर्माण होत आहे. मात्र काही शेतकरी अजुनही शेतीत नवीन नवीन प्रयोग करुन यशस्वी शेती करीत आहे. असाच प्रयोग आ.विजय रहांगडाले यांनी केला असून त्यांनी आपल्या दहा एकर वडिलोपार्जीत शेतीत विविध प्रजातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली. यातून आता उत्पादन निघण्यास सुरूवात झाली आहे. गोरेगावजवळील चिखली परिसरात आमराई फुलत आहे.तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आ.विजय रहांगडाले यांची गोरेगाव तालुक्यातील चिखली येथे १० एकर शेती आहे. राजकारणात व्यस्त असताना सुध्दा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शेतीवर आवर्जुन जातात. त्यांना सुरूवातीपासूनच शेतीमध्ये रुची आहे. त्यांनी आपल्या दहा एकर शेतीत पांरपरिक पिकाची लागवड करण्याऐवजी विविध प्रजातीच्या आंब्यांच्या झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला.सन २०१३ मध्ये त्यांनी कनेरी, दशहेरी आणि इतर प्रजातीच्या ५०० आंब्याच्या झाडांची लागवड केली. या झाडांना सिंचनाची सोय करण्यासाठी बोअरवेल व शेततळे तयार केले. या झाडांची योग्य काळजी घेतल्याने त्यांची चांगली वाढ झाली. मागील वर्षीपासून त्यातून उत्पादन निघण्यास सुरूवात झाली आहे. कनेरी, दशहेरी आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे. ८० ते १०० रुपये किलो या आंब्याला दर मिळत असल्याचे रहांगडाले यांनी सांगितले. आंब्याची झाडे लावण्यासाठी एकदाच खर्च आला. त्यानंतर मात्र झाडांची योग्य काळजी घेतल्याने उत्पन्न मिळण्यास सुरूवात झाली.आंब्याच्या विक्रीतून दरवर्षी जवळपास दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे. एकंदरीत त्यांनी धानाची शेती करण्याऐवजी शेतात नवीन प्रयोग करुन शेतकºयांसमोर आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे ते आता या शेतीत एक हजार फणसाच्या झाडांची लागवड करणार आहेत.वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून फणसाची रोपटी मागविली असून पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर त्याची लागवड करणार असल्याचे रहांगडाले यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी तीच तीच पिके घेणे टाळावेरासायनिक खतांचा अधिक वापर आणि तिच तिच पिके घेतली जात असल्याने जमिनीची उत्पादकता कमी होत आहे.त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकºयांनी पांरपरिक पिके घेण्याचे टाळून इतर पिकांची लागवड करावी असे आ.विजय रहांगडले यांनी सांगितले.२५ लोकांना मिळाला रोजगारचिखली येथील शेतात लावलेल्या आंब्याच्या झाडांचे योग्य संगोपन करण्यासाठी २५ मजूर नियमित काम करतात. फळबाग लागवडीमुळे परिसरातील मजुरांना सुध्दा रोजगार मिळत आहे.

टॅग्स :MangoआंबाFarmerशेतकरी