शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त गॉगल्स ठरू शकतात डोळ्यांसाठी हानिकारक ! गॉगल घेताना काय काळजी घ्यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:38 IST

Gondia : गॉगल नेमका कोठून व कशा पध्दतीचा खरेदी करावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डोळे हा शरीराचा नाजूक अवयव आहे. त्यामुळे त्याची सुरक्षितता व काळजी घेणे गरजेचे आहे. धूळ, सूर्याची तीव्रता यासह इतर बाबींमुळे डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी बहुतांश जण गॉगल्स खरेदीवर भर देतात. गॉगल नेमका कोठून व कशा पद्धतीचा खरेदी करावा, याबाबत विचार करण्यात येत नसल्याने भविष्यात डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे नाजूक अवयव असल्याने डोळ्यांसाठी चांगले गॉगल्स घेण्याकडे नागरिकांनी प्राधान्य दिले पाहिजे, असे नेत्रविकार तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

उन्हाळा सुरू होताच शहरासह विविध मार्गावर गॉगल्स विक्रेते स्टॉल लावून विक्री करताना दिसतात. त्यामुळे विविध प्रकारचे गॉगल्स खरेदी करण्यावर तरुण भर देतात. मात्र, खरेदी करताना शंभरपर्यंतच्या गॉगल्सची मागणी बहुतांश जणांची असते. परिणामी, स्वस्त गॉगल्स डोळ्यांना हानिकारक ठरू शकतो. 

लांब पल्ल्याचा प्रवास करताय तर घ्या काळजीअनेक जण विशेषतः तरुण दुचाकीने लांबचा प्रवास करण्यावर भर देतात. यादरम्यान रस्त्याने जाताना उन्हापासून, धुळीपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक असते.

हलक्या चषयामुळे डोळ्यांवर ताण, डोकेदुखीहलक्या चषयांमुळे डोळ्यांवर ताण निर्माण होतो. शिवाय व्यवस्थित दिसत नसल्याने अंतराचा अंदाज येत नाही. परिणामी डोकेदुखीचा त्रास वाढण्याची शक्यता असते. अनेकदा डोळ्यांचा नंबर बदलत असतो. त्यामुळे स्वस्तातील चष्मा परिधान करणे महागात पडू शकते. असे गॉगल्स खरेदी करताना प्रत्येकाने विचार करणे आवश्यक असल्याचे मत नेत्रतज्ज्ञांकडून व्यक्त केले जाते.

गॉगल घेताना काय काळजी घ्यावीउन्हाळा वाढल्याने डोळ्यांच्या सुरक्षेसाठी अनेक वेळा फुटपाथवरील गॉगल घेतला जातो. परंतु हा गॉगल डोळ्यासाठी लाभदायी ठरत नसल्याचे अनेक वेळा पुढे आले आहे. त्यामुळे गॉगल घेताना चांगल्या प्रतीचा घेऊन तो डोळ्यांसाठी अपायकारक आहे की, लाभदायक हे नेत्रतज्ज्ञांकडून समजून घेणे गरजेचे आहे. 

१०० रूपयांत मिळतो चष्माउन्हाळा सुरू होताच विविध मार्गालगत गॉगल्सचे स्टॉल पाहायला मिळतात. फक्त ९९ रुपयांत गॉगल्स अशा पाट्याही पाहायला मिळतात. अनेक जण स्वस्तात मिळत असल्याने खरेदी करतात. पण त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होईल याकडे दुर्लक्ष करतात.

ऊन तापतेय; धूळ उडतेयमागील काही दिवसांपासून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सद्यःस्थितीत तापमान ३६ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे नागरिक शक्यतो उन्हात घराबाहेर पडणे टाळत असले तरी अनेक जण रस्त्यावरून फिरताना दिसून येतात. यादरम्यान वाहनांमुळे उडणारी धूळ, ऊन हे डोळ्यांसाठी हानिकारक आहे. त्यामुळे उन्हात फिरताना नागरिकांनी गॉगल वापरणे गरजेचे आहे.

टॅग्स :Lifestyleलाइफस्टाइलgondiya-acगोंदिया