गोठणगाव : एकात्मिक आदिवासी विकास उपविभाग नवेगावबांध येथील ग्रेडर या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीकडे उपव्यवस्थापकाचा प्रभार, लेखापाल व चार आधारभूत धान खरेदी एम.आय.ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या या अजब कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शेतकरी आपले धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकतात परंतु चुकारे महिनो महिने होत नाही. एक एम.आय. व केंद्र चार ज्याप्रमाणे आदिवासी सेवा सहकारी संस्था गोठणगाव, केशोरी, इळदा व बाराभाटी या व्यतिरिक्त उपव्यवस्थापक व लेखापालची कामे करावी लागतात. काही दिवस जनता दरबारकडे तर काही कार्यालयीन बैठकीत जातात. त्यामुळे विक्री केलेल्या धानाचे हुंडी काढण्यास उशीर होत असते म्हणून धानाचे चुकारे देण्यास विलंब होत आहे. शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. चुकारे थकल्याने शेतमजुरांची मजुरी सुद्धा शेतकऱ्यांनी दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहे. संध्या उन्हाळी हंगामाला सुरुवात झाली आहे. मजुरांमुळे शेतीचे कामे खोळंबली आहेत. करीता शासनाने नोकरभरती करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.