लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : शासनाकडून आरोग्यविषयक विविध उपाययोजना राबवून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. परंतु काही पदाधिकाºयांच्या मनमर्जी कारभारामुळे गावाचेच आरोग्य धोक्यात येत आहे. श्रीरामनगर येथे दोन ते तीन फूट खोल डबक्यांत पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे रहदारीच्या समस्येसह गोठ्याची भिंत कोसळण्याची दाट शक्यता आहे.नागरिकांच्या आरोग्याची दखल घेवून दरवर्षी विविध योजना शासनाकडून राबविल्या जातात. मात्र काही पदाधिकाºयांच्या मनमर्जी व हलगर्जीपणामुळे नियमाचे उल्लंघन होते. सौंदड परिसरातील पुनर्वसीत श्रीरामनगर येथील ग्रामपंचायतीने ग्रामस्थांनाच आजारी पाडण्याचे षडयंत्र रचले आहे, अशी चर्चा गावात सुरू आहे.४ जून रोजी दिगंबर दयाराम रहेले यांनी श्रीरामनगर येथील ग्रामपंचायतला लेखी अर्ज केला होता. त्यात रहेले यांच्या घराशेजारी डबक्यामध्ये दोन ते तीन फूट पावसाचे पाणी साचले. त्यामुळे त्यांच्या जनावरांचा गोठा पडण्याची भीती बळावली आहे. तर घराशेजारी डबक्यामध्ये साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सदर जागेतील पाणी काढण्याकरिता ग्रामपंचायतने पुढाकार घ्यावा. अन्यथा परिसरात आणखी विविध समस्या निर्माण होवू शकतात, अशी तक्रार केली होती. परंतु त्यांच्या दिलेल्या अर्जाला दुर्लक्षीत करण्यात आले. त्यामुळे त्यांनी सडक अर्जुनी येथील खंड विकास अधिकारी यांच्याकडे धाव घेतली. खंडविकास अधिकारी यांना २० जून रोजी लिखित अर्ज देण्यात आले. परंतु त्यांनीही आजपर्यंत याबाबत कसलीही दखल घेतली नाही. शासनाच्या योजना मानवाच्या संरक्षणाकरिता राबविल्या जातात. परंतु याठिकाणी उलट घडत असल्याचे दिसून येत आहे. रहेले यांच्या घराशेजारी साचलेल्या पाण्यामुळे घरातील व मोहल्ल्यातील बालके आजारी पडले तर त्याला जबाबदार राहणार कोण? अशा सवाल येथील नागरिक करीत आहेत.सध्या पावसाळा असल्यामुळे नालीचे बांधकाम करता येत नाही. आम्ही ते ठरावामध्ये घेतले आहे. पावसाळा संपताच त्या ठिकाणी भरण भरुन काम पूर्ण करु.-भरत पंधरेसरपंच, श्रीरामनगर
भिंत कोसळण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:12 IST
शासनाकडून आरोग्यविषयक विविध उपाययोजना राबवून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. परंतु काही पदाधिकाºयांच्या मनमर्जी कारभारामुळे गावाचेच आरोग्य धोक्यात येत आहे.
भिंत कोसळण्याची शक्यता
ठळक मुद्दे डबक्यात साचते दोन फूट वर पाणी : आजारही पसरण्याची भीती वाढली