गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा गोंदिया कडून नवनिर्वाचित पं.स.गोंदियाचा सभापती स्नेहाताई गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती व प्रभारी गटशिक्षणाधिकारी अशोक बरईकर यांचा सामूहिक सत्कार पं.स.सभागृह येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी उपसभापती चमन बिसेन प्रमुख पाहुणे एम.डी. पारधी, एल.एम. गौतम उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष अनिरूद्ध मेश्राम, सरचिटणीस गणेश चुटे यांनी शाल व श्रीफळ देवून त्रिमूर्तीचे सत्कार केला. संघाचे पदाधिकारी अध्यक्ष अनिरूद्ध मेश्राम, सरचिटणीस गणेश चुटे, विरेंद्र कटरे, नागसेन भालेराव, एस.यु. वंजारी, आनंद पुजे, अजय चौरे, एम.आर. बोपचे, चंदु दमाहे, हेमंत पटले, पी.डी. पटले, मोरेश्वर बडवाईक, के.आर. मानकर, देवेंद्र जतपेले, चरण सुर्यवंशी, शामा बिसेन, चंदु दुगे, नरेंद्र कटरे, जी.एम. ठुले, एन.आर. कोल्हे, वाय.बी. चावके, ओ.बी.चौधरी, के.के. पटले, एम.बी. राठोर, आर. मोहनकर, जे.पी. कुरंजेकर, कोसरकर, एस.एम. बिसेन, केशव मानकर, रेणुका जोशी, यशोधरा सोनवाने, करूणा मानकर, के.आर. कापसे, डी.एस. कोल्हे, पारधी, फुले, धकाते उपस्थित होते. संचालन विनोद लिचडे तर आभार वा.डी. पटले यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)